गडावर असणारे शरभ शिल्प व त्याचा अर्थ - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१३ एप्रिल २०२१

गडावर असणारे शरभ शिल्प व त्याचा अर्थ

गडावर असणारे शरभ  शिल्प व त्याचा अर्थ 


माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव

फेसबुक लिंक http://bit.ly/3te4SUt
हाराष्ट्रातील प्रत्येक गडावर काही ना काही शिल्प असते.त्या गडावर क्रित्येक राजवटी झाल्या असतील,प्रत्येक राजवटीने काही तरी शिल्पाची उभारणी केलेली आहे गडांच्या प्रवेशमार्गावर हनुमान, गणपतीच्या कोरीव मूर्ती आढळतात, तर प्रवेशद्वारांवर शरभ, गंडभेरूंड, व्याल, गज, कमळ आदी कोरलेले आढळतात. खुद्द गडमाथ्यावर काहीवेळा आगळ्यावेगळ्या मूर्ती आढळतात. मंदिरांचे काही अवषेश, काही स्थानिक गडदेवतांच्या मूर्ती, शिवलिंग इत्यादी तर पोर्तुगीज, ब्रिटिशांची सत्ता राहिलेल्या किल्ल्यांवर त्यांचे नाविक सामर्थ्याचे चिन्ह, जगावरील त्यांच्या स्वामित्वाची चिन्हे आढळतात. गडावरची द्वारशिल्पे पाहिली असता असे लक्षात येते की यातून गडाच्या मालकाला म्हणजेच राज्यकर्त्याला काहीतरी संदेश द्यायचा असेल. गडमंदिरावरील द्वारशिल्पामध्ये गंडभेरुडाच्या चोचिंमध्ये व पायाच्या नखांमध्ये हत्ती दिसतात. काही ठिकाणी शरभाच्या पायात हत्ती दिसतात तर कधी गंडभेरुडाच्या पायात शरभ आणि शरभाच्या पायात गंडभेरुड दिसते. यावरून कोणत्या राजसत्तेने कोणावर विजय मिळविला असावा याचा अंदाज बांधता येतो तसेच हा गड किंवा दरवाजा कोणत्या राजसत्तेने बांधला असावा हे समजू शकते. शरभाची संकल्पना अनेक धर्मांमध्ये असावी असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण हिंदू धर्माप्रमाणे भगवान शंकराचे अर्धमानव अर्धपशू किंवा अर्धपक्षीरूप म्हणजे शरभ.  जंजिऱ्याच्या महादरवाज्यावर व्याघ्रसदृश शरभाचे शिल्प आहे आणि तो बांधणारा मुस्लिम शासक होता. मुरुड जंजिरा कोणत्याही हिंदू राज्यकर्त्याला जिंकता आला नाही असे असताना हिंदू धर्मशास्त्रातील शरभ मुसलमान राज्यकर्त्याने बांधलेल्या किल्ल्यावर कसे ?श्रीलंकेच्या राष्ट्रध्वजावर तलवार घेतलेला खड्गधारी शरभ पाहायला मिळतो.
यक्ष आणि यक्षी या संरक्षक देवता असून त्या बरेचदा दिसायला भयंकर असतात. यांना रुप बदलण्याची कला अवगत असते अशा आख्यायिका वाचल्या आहेत त्यानुसार असे यक्ष-यक्षी मंदिरांत किंवा बौद्ध विहार, चित्रांत वगैरे दिसतात.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगांवची पोस्ट,किन्नर हयवदन असतात. सर्वच किन्नर घोड्याच्या तोंडाचे नसतात असे सांगितले जाते. सेंटॉरच्या विरुद्ध प्रकार वाटतो. ;-) किन्नर हे गाणे-बजावणे करतात परंतु गंधर्वांइतका मान त्यांना नसतो असे वाटते. काही गंधर्वही हयवदन असल्याचे वाचले आहे.,

शरभ शिल्प:- ( फोटो सुधागडावरील) महाराष्ट्रातील किल्ल्यावर सर्वात मोठय़ा प्रमाणावर आढळणारं द्वारशिल्प म्हणजे शरभ.

शरभ  शिल्प व त्याचा अर्थ

सिंह आणि व्याल यांच्यासारखे विक्राळ तोंड, चार.पाय.आणि लांब शेपटी असणारा काल्पनिक प्राणी म्हणजे शरभ. हा शंकराचा अवतार मानला जातो.‘कामिकागम’,‘उत्तरकामिकागम’, ‘श्रीतत्वनिधी’ आणि ‘शरभोपनिषद’ या ग्रंथांत शरभाचे वर्णन आणि त्याची उपासना केल्याने होणारे फायदे दिलेले आहेत. शरभाच्या कथेनुसार हिरण्यकश्यपूचा वध केल्यावरही नरसिंहाचा उग्रपणा काही केल्या कमी होत नव्हता. त्यामुळे त्याच्यापासून सुटका करून घेण्यासाठी भक्तांनी शंकराकडे धाव घेतली. शंकराने सिंहासारखी दोन डोकी, तीक्ष्ण नख्या, दोन पंख, आठ पाय आणि लांब शेपूट असलेल्या प्राण्याचं रूप घेतलं. त्याने नरसिंहाला ठार मारून त्याच्या मुंडक्याने आपला जटमुकुट सुशोभित केला आणि त्याचं कातडे स्वत: पांघरलं. शिवाच्या या कृत्यामुळे त्याला ‘शरभेशमूर्ती’ किंवा ‘सिंहघ्नमूर्ती’ असं संबोधण्यात येऊ लागलं.

हिंदू पुराणातल्या या शरभाचा सर्व मुस्लीम शासकांनी आपलं द्वारचिन्ह म्हणून वापर केलेला पाहायला मिळतो. हा शरभ कधी एकटाच कोरलेला असतो, तर कधी त्याच्या पायात गंडभेरुंड दाखवलेला असतो. काही शरभाच्या पायात एक हत्ती ते शरभाच्या चार पायांत चार, तोंडात एक आणि शेपटीत एक हत्ती असे जास्तीत जास्त सहा हत्तींवर वर्चस्व गाजवणारा शरभ दाखवलेला असतो. यावरून मुस्लीम शासकांनी शरभ म्हणजे जंगलाचा राजा सिंह या अर्थाने शरभ शिल्पाला प्रवेशद्वारावर स्थान दिले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी त्याला प्रवेशद्वारावर स्थान दिले असावे.किल्ले रायगड बरोबरच मुरुड मधिल जंजिरा किल्याच्या प्रवेश द्वारावर, हरिश्चंद्र गडाच्या वाटेवर तोलार खिंडत, राजगड, अवचितगड, पनवेल जवळील कर्नाळा कील्ला, सुधागड, तळगड, शिवनेरी  अशा कित्येक ठीकाणी हे शिल्प पहावयास मिळते.याचबरोबर परदेशी छाप असणारे शिल्प म्हणुन कोर्लई  किल्लावरील पोर्तुगीजांचे 'आर्म्स ऑफ कोट' चिन्ह पाहता येईल.
शरभ  शिल्प व त्याचा अर्थ

(शिलालेखाचा संक्षिप्त अर्थ: हा किल्ला बांधण्याची आज्ञा भारताचा व्हाईसरॉय डॉंम फिलिपे मस्कारेन्हास याने १६४६ मध्ये दिली आणि चौलचा कॅप्टन फर्नाओ मिरांडा हेन्रीक्स याने १६८० मध्ये हे काम संपवले. ह्या किल्ल्याचा कॅप्टन(किल्लेदार) क्रिस्ताव डी अबेइरू डी अझेवेदो हा आहे)