भारतीयानी शोधलेले पण पण परकीय म्हणून ज्ञात असणारे शोध - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२८ एप्रिल २०२१

भारतीयानी शोधलेले पण पण परकीय म्हणून ज्ञात असणारे शोध

भारतीयानी शोधलेले पण पण परकीय म्हणून ज्ञात असणारे शोध


दि. २८ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3vr95oM
प्राचिन भारतात अनेक शोध लागले,पण निरिक्षरता व अज्ञानामुळे हे शोध व त्याचे जनक म्हणुन परकीय लोकानी तयांचे श्रेय घेतले.भारताच्या प्राचीनत्वतेचे जेवढेदाखले द्यावेत तेवढे कमीच आहेत. आपल्या देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही, कारण तसे पुरावे देखील उपलब्ध झालेले आहेत. या प्राचीन भारताने जगाला अनेक गोष्टी दिल्या हे देखील तितकेच खरे. तेव्हाची संस्कृती ही त्या काळाच्या मानाने अधिक प्रगत आणि ज्ञानी होती आणि त्यांनी लावलेले काही शोध आपण आजही वापरतो यावरूनच त्यांच्या श्रेष्ठतेची कल्पना करता येते. शुन्य, संस्कृत, साप-शिडीचा खेळ, रेडिओ आणि वायरलेस संचार सेवा, फ्लश टॉयलेट, गणिताची पट्टी आदी शोध प्राचिन भारतात लावण्यात आले होते. परंतु, पण दुर्दैवाने काळाच्या ओघात ते हरवून गेले आणि आज तेच शोध जणू पाश्चिमात्यांनी लावले आहेत असा एक गोड गैरसमज आपल्या तरुण पिढीच्या मनात आहे.
       📿कापूस कातणारा चरखा…
कापूस कातण्याचा चरखा, ज्याला कापूस जिन म्हटले जाते, यात कापसाच्या बोंडातून बिज काढले जाते. अजिंठा आणि वेरूळ येथील गुफांमध्ये मिळालेल्या पुराव्यांवरून इसवीसन पूर्व ५०० मध्ये हाताने चालविण्यात येणाऱ्या या मशिनला तेव्हाही चरखाच म्हटले जात असे. कालानुरूप या मशिनमध्ये अनेक बदल झाले. त्यामुळे चांगल्या खादीचे विदेशात निर्यात केले जात असे.

भारतीयानी शोधलेले पण पण परकीय म्हणून ज्ञात असणारे शोध

🙇🏼‍♀शाम्पू…
शाम्पूचा शोध भारतात पहिल्यांदा लावण्यात आला होता. त्याला आधी चांपो म्हटले जायचे. १७६२ च्या जवळपास मुघलकालीन शासनकालामध्येबंगालच्या नवाबांनी याचा उपयोग केला होता. तेव्हा डोक्याची मालिशकरण्यासाठी याचा तेलाच्या रुपात उपयोग केला जायचा. त्याचेही काही प्रकार होते.

⚙क्रूसिबल स्टील…
उच्च गुणवत्ता असलेले स्टील प्राचीन भारतातील दक्षिणेकडील भागांत तयार केले जात असे. ज्या पद्धतीने हे स्टील तयार केले जात होते त्याच पद्धतीने क्रूसिबल तंत्रज्ञानाचा वापर करून स्टील घडविण्यात येते. याअंतर्गत शुद्ध लोखंड वितळवून एका कंटेनरमध्ये काच आणि लाकडांसोबत ठेवले जाई. त्यानंतर शुद्ध स्टील बनत असे.
🗑नैसर्गिक रेशम…
लोकर, खादी याप्रमाणेच नैसर्गिक रेशम सर्वात आधी भारतात शोधण्यात आले. सिंधू नदीच्या खोऱ्यात राहत असलेले लोक खादीचा वापर करीत असत. त्यांच्याजवळ नैसर्गिक पद्धतीनेरेशम मिळवण्याचे तंत्रज्ञान होते. प्राचीन भारतात याचा वापर करण्यात येत होता. तसेच निर्यातहीकेली जात असे. याप्रमाणेच चांगली लोकर प्रथम जम्मू-काश्मीरमध्ये बनविण्यात आली होती.
⚓बंदर…
भारत पहिला असा देश आहे, जेथे इसवीसन पूर्व २००४ मध्ये समुद्र किनाऱ्यांवर बंदर होते. हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी लोथलमध्येपहिले बंदर उभारले होते. त्यासाठीत्या काळातील अत्याधुनिक समुद्र विज्ञान आणि इंजिनिअरिंगचा वापर करण्यात आला होता. समुद्राच्या लाटा आणि हायड्रोग्राफीचे ज्ञान वापरून हे बंदर बांधण्यात आले होते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट
💎हिरा…
दागिन्यांमध्ये वापरला जाणार हिरा पहिल्यांदा भारतीय खाणींमध्ये सापडला होता. मध्य भारतात हिऱ्यांचे मोठे भंडार सापडले आहे. १८ व्या शतकात भारत एकमेव देश होता जेथे हिरा सापडला होता. त्यानंतर भारताने हिऱ्याची निर्यातही सुरू केली होती. यासोबतच प्राचीन भारतीयांना हिऱ्याची उपयोगीता, हिरा कापण्याची क्षमता आणि चमक टिकवून ठेवण्याचे तंत्रज्ञान अवगत होते.
🀄बुध्दिबळ…
चतुरंगा नंतर बुद्धिबळाचा शोध लावण्यात आला होता. गुप्त वंशकाळात ६ व्या शतकाच्या जवळपास भारतात याचा शोध लावण्यात आला. प्राचिन काळापासून हा खेळ खेळला जात होता.
✍शाई…
शाई ही लिखाणासाठी अतिशय महत्त्वाची वस्तू आहे. याचा शोध भारतात लावण्यात आला होता. प्राचीन भारतातील पांडुलिपिमध्ये काळ्या रंगाची शाई वापरली जात असे. जळालेली राळ, चारकोल, हाडे आणि कार्बन यांच्या मिश्रणातून शाईची निर्मिती होत असे.
🔪सर्जरी…
मोतीबिंदूची शस्त्रक्रिया आणि प्लास्टिक सर्जरी प्रथम भारतात करण्यात आली, याचे पुरावे मिळाले आहेत. प्राचीन चिकित्सक सुश्रुत यांनी पहिल्यांदा अशी सर्जरी केली होती. त्यांनी वापरलेल्या पद्धतीचे अरेबिक भाषेत भाषांतर करण्यात आले. त्यानंतर ती युरोपमध्ये गेली. त्यांनी एका गोलसुईचा वापर करीत मोतिबिंदू काढला होता.
🧥बटण…
शर्ट-पॅण्ट आणि इतरही कपड्यांमध्ये बटणा लावल्या असतात, आता तर त्याला एक फॅशन एक्सेसरी म्हणून देखील वापरल्या जाते. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण ही गोष्ट खरी आहे की बटणचाशोध प्रथम भारतात लावण्यात आला. याचे अनेक ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. सिंधू नदीच्या खोऱ्यात बटण वापरत असलेले लोक राहत होते. शिंपल्यांना वेगवेगळे आकार देऊन त्यात छिद्र करण्यात येत होते. लवकरच त्यात बदल झाला. त्याच्या डिझाईनमध्ये सुधारणाहीकरण्यात आल्या होत्या.झाला ना आता गैरसमज दूर? हे पाश्चिमात्यांचे नाहीत, तर आपल्या पूर्वजांचे शोध आहेत!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव  🥇      
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂