थोरांताची कमळा
पन्हाळयाजवळ आपटी या गावात एक थडगे आहे.ते थडगे कथित कमळा थोरात हिचे आहे,असेच आजपर्यंत सांगितले गेले.व लोकही ते खरे मानत गेले.यामुळे गेल्या पिढिकडुन दुसरया पिढिकडे हा बदनाम इतिहास असाच सांगितला गेला.,पन्हाळ्याचे सुप्रसिध्द इतिहास संशोधक श्री. मु.गो.गुळवणी यांनी खरा इतिहास शोधुन काढून छत्रपती संभाजी महाराजाच्या चरित्रावर वाढलेले बांडगुळ मुळापासून उपटून टाकलेआहे.आपटी गावाच्या दक्षिणेस अर्ध्या मैलावर शेतरानात ही तथाकथित थोरातांच्या कमळेची समाधी उभी आहे.प्रथम गुळवणी यांनी तहसील कचेरीत या शेताची व त्यावरील या वास्तुची नोंद काय आहे, याचा तपास काढला, ती नोंद अशी मिळाली. "सर्व्हे नंबर १९७,क्षेत्र १एकर १५गुंठे,खराब ३गुंठे, आकार तीन रूपये चार आणे. जमिनीचे वहिवाटदार श्री आप्पा धोंडी कदम. ३ गुंठे खराब जमिनीत ही ऐतिहासिक वास्तु आहे. तिला कागदोपत्री थोरातांचे थडगे असे नोंदलेले आहे.
तेव्हा एक गोष्ट स्पष्ट झाली की कोणा एका इतिहासकालीन थोरात नामक व्यक्तिची ही समाधी आहे. 'कमळे'चा उल्लेख कागदोपत्री नव्हता. पण तो कागदोपत्री नव्हता म्हणून ते थोरातांच्या कमळेचे मंदिर नव्हते, असे विधान करणे धाडसाचे ठरले असते. आता दुसरा प्रश्न होता की, हे कुणा 'थोराताचे' थडगे आहे? हे समजायला मार्ग नव्हता.यासाठी त्यांनी अनेक मोडी लिपितले कागद तपासले मग ऐतिहासिक कागदपत्रांचा मागोवा घेत असताना त्यांना कै वि का राजवाडे यांनी संपादित केलेल्या ,'मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ३' या साधन ग्रंथात जिवाजी बिन शिदोजी थोरात यांचा करीना सापडला आणि मग या थोरातांच्या थडग्याचे कोडे उलगडत गेले.!
पेशवा बाळाजी विश्वनाथ हा दिल्लीच्या मोहिमेवरून परतल्यानंतर त्यास शाहु महाराजांनी करवीर राज्याच्या स्वारीवर पाठविले. यावेळी यशवंतराव विजापुर प्रांती कामगिरीवर होता.त्यास बाळाजीच्या स्वारीची वार्ता समजताच तो वारणेच्या प्रदेशात आला. पुढे काय झाले हे करीना सांगतो,
"येसबा(यशवंतराव)अष्टेस आले.तंव पुढे रावप्रधान फौजा घेऊन दुसरे रोजी अष्टेस गाठ घालावी या विचारे निघोन आले. हे वर्तमान येसबास कळताच रातोरात ठाणेत काही लोक ठेऊन पन्हाळेत मुले माणसे घेऊन गेले...तेथून (बाळाजीचे) लष्कर जाऊन कोल्हापुरास वेढा घातला . एक रोज पन्हाळ्यावर चालोन येत असता येसबाचे फौजेस गाठ पडली,युध्द जाहले.येसबास भाला लागला, तेच जखमेने मृत्यु पावले. आपले तीर्थरूप (सिदोजी)आपले जमावानिशी जवळच होते.येसबाचे पोटी संतान नाही.धाकटे भाऊ चौघे होते. ती लहान मुले त्यांची मातोश्री सईजीआवा होती.नायकीचा आव पडे ऐसे कोणी नव्हते आणि विठोजी चव्हाण यांसी दावा लागला असे, ऐसी संधी पडली.येसबाची बायको गोडाबाई होती तिने सहगमन केले.ते समयी घोडी व बिध्णत होती ती कर्जदारास व लोकांस देऊ लागली. मग ते समयी सर्वांनी विचार केला की या नायकीस आव शिदोजी थोरात यांनी घालावा. लोकांचा दिलासा करून कर्जदारांचा हवाला घ्यावा आणि हे नायकी थोर आहे, बुडवू नये. ऐेसे समस्तांनी शिदोजीबाबास सांगुन उभे केले. तेव्हा यांनी गोडाबाईपाशी जाऊन अवघे लोकांची व कर्जदारांची निराशा केली त्यावर गोडाबाईंनी अग्नीप्रवेश केला.(म्हणजे सती गेली)
पन्हाळ्याच्या पायथ्याशी जिथे ही घटना घडली तिथे थोरात घराण्यातील लोकांनी वीर यशवंतराव व सती गोडाबाई यांचे संयुक्त समाधी मंदिर उभारले आणि गाभाऱ्यात स्त्रीपुरूषाची पाषाण मुर्ती उभारली.ही मुर्ती ढाल,तलवार आदि शस्त्रांनी सज्ज दाखविली आहे. मंदिर घुमटाकार असुन काळया पाषाणात आहे.आपले पुर्वज शिक्षित नव्हते काही लिहुन ठेवत नव्हते म्हणुन खरा इतिहास दबला गेला,व छ. संभाजी महाराज यांच्या वर बदनामीचा शिक्का बसला.श्री गुळवणी यांनी हे बहुमोल संशोधन केले नसते तर अजुन किती वर्षे ही बदनामी होत राहिली असती कुणास ठाऊक.तर असे हे "थोरांताची कमळा" चा खरा इतिहास आहे.
अनिल पाटील,पेठवडगाव
9890875498