शिवरायांची मूळ चित्रे स्वराज्यात परत आणणारे शिवभक्त मालोजीराव जगदाळे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


३० एप्रिल २०२१

शिवरायांची मूळ चित्रे स्वराज्यात परत आणणारे शिवभक्त मालोजीराव जगदाळे

 शिवरायांची मूळ चित्रे स्वराज्यात परत आणणारे शिवभक्त मालोजीराव जगदाळे 

____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
____________________________

फेसबुक लिंक http://bit.ly/3aQA714
महाराष्ट्राचा अभिमानबिंदू असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल चित्र महाराष्ट्रात आणण्याची मोहीम
पुण्याचे मालोजीराव जगदाळे या इंजिनीअर तरुणाने फत्ते केली. महाराजांचे मूळ चित्र म्हणून राज्य शासनाने यापूर्वी याच चित्राला मान्यता दिलेली आहे. मात्र, त्याची मूळ प्रत आपल्याकडे उपलब्ध नव्हती. हे चित्र आणि महाराजांचे यापूर्वी कधीही न पाहिलेले रंगीत चित्र नेदरलँड आणि क्रोएशिया येथील संग्रहकां कडून मालोजी यांनी आणले आहे.याचबरोबर २०१५ साली त्यांनी लंडन येथे  रॉयल  कलेक्शन मध्ये असलेल्या शिवछत्रपतींच्या जगदंबा तलवारीचे  एच.डी छाया चित्र मिळवण्यात यश आले होते.त्यांची शिवभक्ती इतकी प्रखर होती की यासाठी त्यांनी कोणतीही किंमत देण्याची तयार ठेवली होती.शिवरायांचे चित्र भारतात आणल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने मालोजीराव जगदाळे यांचे अभिनंदन केले आहे.

पहिले चित्र (कृष्णधवल) 'मार्गो एन फ्रँक वॅन लॅटम - वॅन डंगन' या डच संग्रहकाकडून, तर रंगीत चित्र क्रोएशियातील लादिमीर मेडमोर या संग्रहकाकडून मालोजी यांनी विकत घेतली आहेत. यापैकी पहिले चित्र डच संग्रहकांच्या ऑक्शन हाऊसकडून आणि दुसरे चित्र खासगी संग्रहका कडून उपलब्ध झाले आहे

शिवरायांची मूळ चित्रे स्वराज्यात

कृष्णधवल चित्र
हे चित्र फ्रान्स्वा वॅलेंटाइन या डच अधिकाऱ्याच्या 'ओल्ड अॅण्ड न्यू ईस्ट इंडिया' या चौथ्या खंडाच्या दुसऱ्या भागात प्रकाशित करण्यात आले आहे. त्याने या पुस्तकात पूर्वेकडील देश, जसे की भारत आणि तेथील मुघल सत्ता याचे अभ्यासात्मक वर्णन केले आहे. त्यात शिवछत्रपतींच्या आयुष्यातील इ. स. १६६२ ते १६८० या कालखंडातील पराक्रमाचा आढावा घेण्यात आला आहे. त्याचा उल्लेख असणारी खंडातली चार मूळ पानेही या चित्रासोबत मिळाली आहेत.
रंगीत चित्र
छत्रपती शिवाजी महाराजांचे घोड्यावर विराजमान असलेले हे रंगीत चित्र यापूर्वी कुणीही पाहिलेले नाही, प्रथमच हे चित्र लोकांसमोर येत आहे हे याचे वैशिष्ट्य.

''शिवरायांचे किमान एकतरी अस्सल चित्र भारतात यावे म्हणून मी प्रयत्नशील होतो, त्यासाठी खर्च आला तरी पर्वा नव्हती. युरोपातील शक्य तितक्या खाजगी संग्राहकांशी, संस्थांशी यासंदर्भात संपर्क साधला असता क्रोएशिया मधील लादिमीर मेडमोर या संग्राहकाशी मेल द्वारे बोलणे झाले आणि त्याने मला शिवरायांच्या या चित्राची माहिती दिली.'' - मालोजीराव जगदाळे


________________________
मालोजीराव जगदाळे ह्यांच्या युट्युब चॅनेलची लिंक :

____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव 9890875498
____________________________