वनबिबी :: यादेवीची हिंदू-मुस्लीम पुजा करतात - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२७ एप्रिल २०२१

वनबिबी :: यादेवीची हिंदू-मुस्लीम पुजा करतात

वनबिबी :: यादेवीची हिंदू-मुस्लीम  पुजा करतात   𖣘 दि. २६ एप्रिल २०२१

फेसबुक लिंक http://bit.ly/3aIkybA
हिंदू मुस्लिम एकतेचा धागा दिसणारे मंदिर भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर सुंदरबन नावाचा परिसरात आहे.
    तसं पाहिलं तर मुस्लीम लोक मूर्तिपूजेच्या विरोधात आहेत. मूर्तिपूजा करणाऱ्या व्यक्तीला ते काफिर संबोधतात. पण वनबिबीचे हे मंदिर हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक आहे.
भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर सुंदरबन नावाचा परिसर आहे. हे जगातील सर्वांत मोठं दलदलीचं जंगल आहे. युनिस्कोनं याचा समावेश जगभरातल्या आश्चर्यांमध्ये केला आहे.
बांगला भाषेत सुंदरबनचा अर्थ होतो, सुंदर जंगल. जवळपास 10,000 वर्ग किमी एवढा या जंगलाचा परिसर आहे. या जंगलात शेकडो द्वीप आहेत. तसंच वेगवेगळ्या प्रकारची जनावरं या जंगलात आढळतात. सस्तन जनावरांच्या इथं 50 प्रजाती पाहायला मिळतात. तर 315 प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात. तर सापाचे वेगवेगळे 315 प्रजाती इथं वास्तव्यास आहेत.पण, सुंदरबन जंगल हे रॉयल बंगाल टायगरसाठी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. घनदाट जंगलात राहणारे रॉयल बंगाल टायगर आता फक्त याच परिसरात पाहायला मिळतात. अनेकदा त्यांनी पर्यटकांवर जीवघेणे हल्ले केले आहेत. असं असलं तरी, कित्येक वर्षांपासून माणसं आणि हे प्राणी सुंदरबनमध्ये एकत्र राहत आहेत सुंदरबन परिसरात जवळपास 45 लाख लोक राहतात. मासेमारी तसंच जंगलातील मध गोळा करणं आणि लाकूड तोडणं हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. जंगलात काम करणं या सर्वांसाठी धोकादायक असतं. कारण पाण्यातून मगर, साप अथवा वाघ कधी हल्ला करेल सांगता येत नाही. पण स्थानिक लोक या गंभीर परिस्थितीतही काम करतात.

वनबिबी :: यादेवीची हिंदू-मुस्लीम  पुजा करतात

इथं दरवर्षी जवळपास 60 जण रॉयल बंगाल टायगरच्या हल्ल्यात जीव गमावतात.
दोन्ही समुदायाच्या लोकांना ही देवी एकत्र आणते अशी या लोकांच श्रद्धा आहे. या देवीला भारतीय आणि बांगलादेशी असे दोन्ही लोक मानतात. यात हिंदू आणि मुसलमान दोघांचाही समावेश होतो. श्रीमंत असो अथवा गरीब, सुंदरबनच्या जंगलात कूच करण्याअगोदर लोक या देवीसमोर नतमस्तक होतात.
या देवीला वनबीबी या नावानं ओळखलं जातं. सुंदरबनमध्ये 3 प्रमुख नद्या समुद्रास मिळतात. त्यापूर्वी त्यांच्या छोट्या छोट्या शाखा दलदली प्रदेशातून वाहतात. प्रत्येक वादळानंतर नदींमधील अंतर कमी होत जातं. याचप्रकारे सुंदरबनमध्ये वनबीबीसमोर हिंदू-मुसलमान हा फरक मिटतो. शेकडो वर्षांपासून दोन्ही समाजाचे लोक सुंदरबनमध्ये गुण्यागोविंदानं राहत आहेत."प्राणी हल्ला करतात तेव्हा ते हिंदू मुस्लीम असा भेदभाव करत नाहीत. त्यामुळे इथं दोन्ही समाजाचे लोक वनबीबीची पूजा करतात. वनबीबीला सुंदरबनची संरक्षक देवी म्हटलं जातं. हिंदू-मुस्लीम एकत्रितपणे तिची पूजा करतात "वनबीबी सुंदबरनच्या मुस्लिमांच्या जीवनाचा अतूट भाग आहे. हिंदू-मुसलमान एकमेकांच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये एकमेकांना बोलावतात." वनबीबीचा जन्म सौदी अरेबियामधील एका मुस्लीम कुटुंबात झाला, ती हजसाठी मक्का इथे गेली, तेव्हा तिला देवत्व प्राप्त झालं. यानंतर ती 5 हजार किमीचं अंतर पार करत सौदी अरेबियावरून सुंदरबनमध्ये पोहोचली, असा एक किस्सा सुंदरबनमध्ये प्रसिद्ध आहे.

ती सुंदरबनमध्ये पोहोचली तेव्हा तिनं पाहिलं की, इथं माणसांची शिकार करणारे वाघ मोठ्या प्रमाणावर आहेत. जंगलावर दक्षिण राय नावाच्या राक्षसाचं राज्य आहे. वनबीबीनं दक्षिण रायचा पराभव केला. पण त्यानं दयेची भीक मागितली, तेव्हा त्याला माफही केलं. वाघांना माणसांवर हल्ले करण्यापासून रोखेल, असं त्यानं आश्वासन दिलं. यानंतर मग वनबीबी सुंदरबनची शासक बनली. दक्षिण राय पळाला आणि जंगलात लपला होता, असं म्हटलं जातं. आता तोच वाघाचं रुप धारण करून लोकांवर हल्ले करतो.
इथले मुसलमान देवीच्या समोर डोकं टेकवत नाहीत. पण, भारत असो की बांगलादेश सुंदरबन परिसरातल्या प्रत्येक गावात प्रवेश करताच वनबीबीचं मंदिर दिसतं. मुस्लीम समाजाचे लोक देवीपुढे दूध, फळ, मिठाई आणि इथर गोष्टी ठेवतात.
मुस्लीम समाजात महिलांना बीबी म्हटलं जातं. याचा अर्थ वनबीबीचं नावसुद्धा हिंदू-मुसलमान यांच्या सहभागी वारशाचा भाग आहे.हे मंदिर हिंदू मुस्लिम धर्मीय एकतेचे प्रतिक आहे.
____________________________
WᕼᗩTᔕAᑭᑭ  9890875498* ☜♡☞
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
______________________________