ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०४ एप्रिल २०२१

ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा

ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा  


तारीख  4 एप्रिल 2021 

फेसबुक लिंक http://bit.ly/3sSvt9B
जगातली सात आश्चर्य आपल्याला लहानपणा पासूनच ओळखीची! पण त्या सात बांधकामांच्या ऐवजी इतरही अशी अनेक बांधकामं आहेत की, ज्यांची गणना आश्चर्य म्हणूनच केली जाऊ शकेल.ही आहेत मॅनमेड वंडर्स...गेल्या काही महिन्यांत क्रांतीच्या उठावामुळे चर्चेत आलेल्या इजिप्तमधील कैरो या शहराजवळ जगातील सात प्राचीन आश्चर्यापैकी एकमेव आश्चर्य, काळाशी धडक देत आपले अस्तित्व टिकवून आहे.

ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा
मानवनिमिर्त अशी ही पृथ्वीवरील सगळ्यात जुनी वास्तू म्हणजेच 'गिझाचा ग्रेट पिरॅमिड'. अनेक शास्त्रज्ञांचा असा अंदाज आहे की हा पिरॅमिड ख्रिस्तपूर्व २८९६ साली बांधण्यात आला असावा. सुमारे साडेचार हजार वषेर् जुना असलेला हा पिरॅमिड इजिप्तच्या 'फेरो' (म्हणजेच राजा) 'खूफू'चे थडगं आहे. पिरॅमिडच्या आतमध्ये वेगवेगळ्या उंचीवर, म्हणजेच जमिनीखाली एक खोली, मधली राणीची खोली आणि सगळ्यात वरची राजाची खोली अशा तीन खोल्या आहेत. या तीनही खोल्या एकमेकांना अगदी चिंचोळ्या मार्गांनी जोडलेल्या आहेत.मात्र साडेचार हजार वर्षं जुन्या असलेल्या या पिरॅमिडच्या बांधकामाविषयी अथवा त्याच्या इंजिनियरविषयी काहीच ठोस माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे आधी बांधकाम व नंतर अभ्यासासाठी तयार केले गेलेले नकाशे असा उलटा प्रकार या पिरॅमिडच्या बाबतीत झाला आहे.या पिरॅमिडचा नुसता फोटो बघितला तर दगडांची रास गोळा करून त्याचा डोंगर तयार केल्यासारखा वाटतो. कारण अरबांनी आक्रमण केलं तेव्हा संपूर्ण पिरॅमिडवर असलेला चुनखडीचा लेप खोदून काढला होता. केवळ 'जगातली सगळ्यात जुनी वास्तू'या व्यतिरिक्तही या पिरॅमिडला खूप महत्त्व आहे कारण बांधकामातली अचूकता आणि परिपूर्णता! उदाहरणादाखल सांगायचं झालं तर कोणत्याही कंपास किंवा कोनमापकाचा वापर न करताही पिरॅमिडचे चारही बाजूंचे कोन ५१ डिग्री ५१ मिनिट्स इतके तंतोतंत आहेत. तसेच प्रत्येक दगडांमधले सांधे १/५ इंच इतके सारखे आणि अचूक आहेत. अशी बांधकामातील अचूकता आणि परिपूर्णता साधणे, आजच्या काळात बांधकामाची सर्व उपलब्ध आधुनिक साधनं वापरूनसुद्धा, अत्यंत जिकीरीचं असतं, असं असताना साडेचार हजार वर्षांपूवीर् हे कसं शक्य झालं असेल? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न अनेकजण आजही करत आहेत.हा पिरॅमिड कसा बांधला असेल याबद्दल अनेकांनी अनेक सिद्धांत मांडले. काहींच्या मते साडेचार हजार वर्षांपूवीर् माणसं आणि तंत्रज्ञान हा पिरॅमिड बांधण्याइतके विकसित झालेच नव्हते. त्यामुळे तो परग्रहावरच्या लोकांनी बांधला असावा.
 
पण नीट विचार केला तर असं लक्षात येतं की बांधकामासाठीच्यासाधनांचा शोध हा गेल्या दोन-तीनशे वर्षांपासूनचा आहे, पण त्यापूवीर्ही अनेक भव्य इमारती बांधल्या गेल्या आहेत. तर मग हा अपवाद का असावा? त्यामुळे बाहेरून एक रॅप (उतरंड) बांधून त्यावरून दगड वरपर्यंत नेऊन पिरॅमिड बांधण्यात आला असावा, असा एक सर्वात लोकप्रिय सिद्धांत आहे तर काहींच्या मते हे रॅप आतल्या बाजूने बांधून दगड वाहून नेले असावेत. पण या पिरॅमिडच्या बाबतीतएक गोष्ट मात्र जाणवते ती ही की या पिरॅमिडचं शिखर इतर पिरॅमिड्सप्रमाणे टोकदार नाही आणि याचाच अर्थ तो अपूर्ण आहे.या पिरॅमिडने केवळ इंजिनियर्स आणि आकिर्टेक्ट्सनाच आश्चर्यचकित केलं आहे, असं नाही तर गणितज्ज्ञ, इतिहासकार, तत्त्ववेत्ते, खगोलशास्त्र, समाजशास्त्रज्ञ आणि पुरातत्वशास्त्रज्ञांनी आव्हानंदिली आहेत.
 ज्या श्चद्ब (=३.१४) चा आज अनेक शास्त्रीय आणि गणिती सूत्रांमध्ये सर्रास वापर केला जातो, त्याचा शोध ग्रीकांनी या पिरॅमिडच्या नंतर सुमारे एक हजार वर्षांनी लावला. पण या पिरॅमिडच्या भूमितीतील अनेक आकडेमोडींमध्ये 'पाय'चा वापर झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळेपिरॅमिडचा आराखडा तयार करणाऱ्यांना 'पाय' माहिती होता का?यासारखे प्रश्न गणितज्ज्ञांना पडतात. तर पिरॅमिडचे विशिष्ट अक्षांश-रेखांश, आतील खोल्यांची रचना आणि आकाशातील अनेक ताऱ्यांच्या पिरॅमिडसापेक्ष जागा खगोलशास्त्रज्ञांना विचार करायला भाग पाडतात.
वर्षानुवर्ष या पिरॅमिडने घातलेल्या अनेक कोड्यांची उत्तरं अनेक क्षेत्रातले शास्त्रज्ञ शोधत आहेत आणि या उत्तरांमध्येच पुढचे प्रश्नही दडलेले आहेत. त्यामुळे गिझाच्या पिरॅमिडची भव्यता जितकीदीपवणारी आहे तितकीच त्याची गूढता भुरळ घालणारी आहे!
तांत्रिक माहिती
उंची ४४९ फूट (४८ मजली इमारत)-पायाचे क्षेत्रफळ : १३ एकर(सुमारे ५.६८,५०० चौ. फूट)- बांधकामासाठी अंदाजे २५,००,००० दगडीक्युब्सचा वापर- सर्वात हलका दगड २.५ टन तर सर्वातजड दगड ७० टन वजनाचा आहे.- पिरॅमिडचे एकूण वजन ५७,५०,००० टन (इतक्या वजनाच्या दगडातून न्यूयॉर्कमधल्या १०२ मजली एंपायरस्टेट बिल्डिंगसारख्या ३० बिल्डिंग बांधता येतील.)- बांधकामासाठी लागलेला वेळ अंदाजे १४ ते २० वषेर्- बांधकामासाठीच्या मजुरांची संख्या अंदाजे ४०,०००
________________________________
💖 माहिती सेवा ग्रूप पेठवड़गाव   💖
✆ 
________________________________