बाजीरावाची मस्तानी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२७ एप्रिल २०२१

बाजीरावाची मस्तानी

बाजीरावाची मस्तानी


फेसबुक लिंक http://bit.ly/3gFCEyE
पुण्यापासून साधारण ८० ते ९० किमी अंतरावर शिरूर तालुक्यात असणारे पाबळ हे गांव. याच गावात मस्तानीने प्राण सोडल्याने कबर बांधली गेली. मस्तानी एक बुंदेल स्त्री. बाजीराव पेशवे यांच्यासोबत पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूच्या धक्क्याने त्या जग सोडून गेल्या. परंतु. खरंच मस्तानी कशी होती? काय आहे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे रहस्य?
इतिहासात रहस्यमय परंतु बदनामी अखेर पर्यंत वाट्याला आलेली ही स्त्री. बुंदेल खंडातील राजा छत्रसाल महाराज यांच्या उपपत्नींपासून झालेली मस्तानी ही कन्या. छत्रसाल महाराज हे तसे प्रणामी पंथाचे. प्रणामी पंथाच्या तत्त्वाप्रमाणे हिंदू-मुस्लीम भेद हा तर ग्राह्य धरत नसत. तिच्यावर झालेल्या संस्कारामुळे ती नृत्य, गायन, तलवार, तिरंदाजी यात प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, मीरा, मस्ताना, केशवदास तुलसीदास हे संत तिला मुखोद्गत होते. उर्दू साहित्याचा, कुराणाचाही तिचा अभ्यास होता. त्या काळात लाखलाख रुपये किंमतीचे असलेले हीरे तिच्या पिखादीला (अंगरखा) गुंडी म्हणून लावण्यात येत असत. अशा या लाडक्या, राजकन्येचा खांडा पद्धतीने बाजीराव पेशवे यांच्याशी विवाह झाला.त्या वेळी छत्रसाल महाराजांनी बाजीरावांना साडेतेहतीस लाखांचा जहागिरीचा प्रदेश व पन्ना येथील हिऱ्यांच्या खाणीतील तिसरा हिस्सा भेट दिला. या विवाह सोहळ्यास पिलाजीराव जाधव, नारोशंकर, तुकोजी पवार, राणोजी शिंदे, गोविंदपंत खेर, दावलजी सोमवंशी असे मातब्बर मराठा सरदार उपस्थित होते. या विवाहाच्या निमित्ताने मराठे व बुंदेला ही नवी सोयरीक निर्माण झाली. छत्रसालांनी बाजीरावांना आपला मुलगाच मानले. छत्रसालाच्या मृत्यूनंतर बाजीरावांचे सांत्वनपत्र उपलब्ध आहे. त्यात ते छत्रसाल पुत्रास म्हणतात, ‘हाल मालुम भयो, श्री श्री श्री महाराज ककाजू साहिब को वैकुंठवास हो गयो, बडी भारी रंज भयी.’ ‘महाराजने हम कौ लडम्का कर कै मानो है, सो मैं वही तरह आप को अपनौ भाई समझे हो.’. शनिवार, २३ सप्टेंबर १७३२ला लिहिलेले हे पत्र. सदर पत्रातून बाजीरावांचा आणि मस्तानीच्या परिवाराबद्दलचा जिव्हाळा किती होता, हेच दिसून येतं. या नंतर बाजीरावांनी मस्तानीला पुण्यात आणले. सुरुवातीची तीन वर्षे मस्तानीची ठीक गेली. परंतु, नंतर एक रखेल या पलीकडे मस्तानीचे अस्तित्व पेशवे कुटुंबाच्या लेखी नव्हते.

बाजीरावाची मस्तानी

दरम्यान, मस्तानीला समशेर हा मुलगा झाला. त्याच दिवसापासून मस्तानीच्या खच्चीकरणास सुरुवात झाली. त्यात तिला नाची कंचनी ठरविले. तिला मद्य पिणारी-प्राशनी ठरविले. अनेक बदनामीच्या अफवा उठवण्यात आल्या. काशीबाईंविषयी अनेक गैर समज निर्माण लक्ष उडाले. परंतु, वास्तवात मात्र मस्तानीचे व काशीबाईंचे संबंध सौहार्दाचे होते. मस्तानी आल्यानंतर काशीबाईंना तीन अपत्ये झाली. त्यातच बाजीरावांनी मस्तानीला तीन गावे इनाम दिली. पाबळ इथे मोठा वाडा बांधला. या सर्व गोष्टींनी पेशवे कुटुंब धास्तावले. त्यांचा विरोधास आणखीनच धार चढली. राजकारणात व रणभूमीवर महाप्रतापी ठरलेले बाजीराव कौटुंबिक संघर्षांत मात्र पराभूत झाले.Ⓜ
पेशवे कुटुंबाने मस्तानीला अटक केली. मस्तानीला मारण्याचे कट रचले गेले. एक धुरंधर योद्धा असलेली मस्तानी इथे मात्र बाजीरावांच्या अनुपस्थितीत एकटी असहाय्य झाली. बाजीरावांनी सामाजिक सौहार्दाचा स्वप्न पाहिले होते. परंतु, तत्पूर्वीच बाजीराव मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूची खबर ऐकताच मस्तानीही त्या धक्क्याने पाबळ येथे मृत्यू पावली.माहिती सेवा गृप
सर्वसाधारण समज आहे, की मस्तानीमुळे बाजीरावांची राजकारणावरील पकड ढिली झाली, दुर्लक्ष झाले. व्यसनाधीनता वाढली; परंतु तो समज खोटा आहे. यानंतर ११ वर्षांत त्यांनी १२ लढाया केल्या आणि मस्तानीच्या अगोदर त्यांनी १० लढाया केल्या आहेत. विसाव्या वर्षी पेशवे झालेले बाजीराव चाळिसाव्या वर्षी मृत्यू पावले. म्हणजे त्यांचे राजकीय आयुष्य फक्त २० वर्षांचेच होते. या २० वर्षांत त्यांनी २२ लढाया केल्या. ३००च्या आसपास लढायांचे व्यवस्थापन केले व शेवट पर्यंत अजिंक्य राहिले. बाजीरावांचे असामान्यत्व वारंवार सिद्ध होत राहील. हजारो मैल दूर बाजीरावांसोबत आलेल्या परंतु मस्तानी च्या वाट्याला अखेर पर्यंत उपेक्षाच वाट्याला आली. पाबळ येथील वाड्यात असणाऱ्या कबरीला उतरती कळा लागली असून, किमान आतातरी शासनाने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
____________________________