वाल्मिकी रामायण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१५ एप्रिल २०२१

वाल्मिकी रामायण

 


  वाल्मिकी रामायण  
_____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव

 _____________________________

इथे मी वाल्मिकी रामायण आणि जैन-बौद्ध रामायणे यांचा थोडक्यात उहापोह करणार आहे..

फेसबुक लिंक http://bit.ly/3uXxLoJ
वाल्मिकी रामायणाची कथा साधारणपणे आपल्याला माहीत असते, कारण शालेय शिक्षणात, मुलांच्या पुस्तकात, कथा-कादंब-यांमध्ये, सिनेमा-टी.व्ही.मध्ये, मेडियामध्ये  हेच रामायण असते. पण खुद्द वाल्मिकी रामायणातील अनेक गोष्टी या प्रक्षिप्त आहेत. इतकेच नाही तर रामायणातील एकूण सात कांडापैकी बालकांड आणि उत्तरकांड हे दोन भाग मूळ वाल्मिकी रामायणात नव्हती, ती नंतर जोडली गेली.
प्रसिद्ध इतिहास संशोधक डी. डी. कोसंबी, एच.डी. सांकलिया यांच्या मते वाल्मिकी रामायण हे इसवी सन पूर्व तिस-या-चौथ्या शतकात लिहिले गेले. रामायणाचा रचनाकाळ इ.स.पू. ५०२२ ते इ.स.पू. ५०४० पहिले शतक या दरम्यान निर्धारित केला गेला आहे. रामाचे राज्य हे आदर्श राज्य होते, असे मानले जाते.रामायणाची मुख्य कथा अयोध्येचा राजपुत्र रामाची पत्नी सीतेचे रावणाकडून अपहरण आणि तत्पश्चात रामाकडून रावणाचा वध अशी आहे. ग्रंथानुसार वाल्मिकी ऋषींनी रचलेल्या या काव्याचा रामाच्या मुलांनी (लव-कुश) प्रचार केला.रामायणाचा उल्लेख नीतिकथा, तात्त्विक व भक्तिसंबंधित चर्चामध्ये येतो. राम, सीता, लक्ष्मण, भरत, हनुमान व कथेचा खलनायक रावण आदी पात्रे भारतीय सांस्कृतिक प्रज्ञेचा हिस्सा बनले आहेत.

वाल्मिकी रामायण  ,

प्रख्यात  इतिहासकार डॉक्टर सुरेंद्र कुमार शर्मा यांनी रामायणातील जनक राजा हा बुद्धोत्तर असल्याचे दाखवून दिले आहे.  त्यामुळे वाल्मिकी रामायण हे महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या नंतरचे ठरते. वाल्मिकी रामायणाचे लेखन महावीर-गौतम बुद्ध यांच्या नंतर झाले याचा आणखी एक पुरावा म्हणजे यातील अयोध्या कांडात, जे जुने मानले जाते, गौतम बुद्धाचा उल्लेख आहे. (यथा हि चोर: स तथा हि बुद्धस्तथागतं नास्तिक मात्र विद्धि  . . .  वाल्मिकी रामायण अयोध्या कांड सर्ग १०९   श्लोक ३४ ). अर्थात हा श्लोक प्रक्षिप्त असू शकतो. वाल्मिकी रामायण संस्कृत भाषेत असणे हे त्याची निर्मिती बुद्धोतर काळात झाली हेच सुचवते. रामाचे सूर्यवंशी असणे ही गोष्ट देखील तो 'नंतर'चा असणे दाखवते कारण प्राचीन भारतातील राजघराणी ही चंद्रवंशी (सोमवंशी) होती, सूर्यवंशी घराणी नंतरच्या काळात भारतात आली.
ते कांहीही असले तरी साहित्याच्या दृष्टीने वाल्मिकी रामायण हे मानवी प्रतिभेचा उत्कृष्ठ आविष्कार आहे. 

_____________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव

 _____________________________