रामदंडी मूर्ती - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२० एप्रिल २०२१

रामदंडी मूर्ती

रामदंडी मूर्ती

भोसला मिलिटरी स्कूल मधल्या राम मंदिरातील ही रामाची मूर्ती आहे.

या मूर्तीच्या मागे एक कथा आहे. ही मूर्ती बनवण्यासाठी ठाण्याचे एक प्रसिद्ध मूर्तिकार आहेत त्यांना विनंती करण्यात आली. परंतु त्यांनी मूर्ती बनवण्यास नकार दिला. पाहिजे तेवढे पैसे देतो असे सांगून सुद्धा त्यांनी पुन्हा पुन्हा नकारच दिला. 

त्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा त्यांना विनंती केली आणि कमीत कमी मूर्ती न बनवण्याचं कारण काय ते तरी सांगा असे विचारल्यावर त्यांनी सांगितलं की राम हा मर्यादापुरुषोत्तम होता, आणि मला सिगरेटचे व्यसन आहे. जोपर्यंत मी सिगारेट पित आहे तोपर्यंत रामाची मूर्ती बनवण्याचा मला हक्क नाही.  खूपच पिच्छा पुरवल्यानंतर त्यांनी प्रथम सिगारेट सोडली आणि मगच ही मूर्ती बनवायला घेतली.

आपण नेहमी सीता, लक्ष्मण आणि हनुमानाबरोबर प्रभू रामाची मूर्ती बघतो. परंतु श्रीरामाची ही अशी एकमेव एकटयाची कोदंडधारी मूर्ती आहे.
म्हणून भोसलाच्या विद्यार्थ्यांना रामदंडी म्हणतात....
रामदंडी मूर्ती

आणखी विशेष म्हणजे भोसला मिलिटरी स्कूलमध्ये फायरिंग प्रशिक्षणादरम्यान फायर झालेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या खाली उरलेल्या पितळापासून ही बनवलेली आहे.