५ मे ला अनसूया मातेचा (देऊळ बंद ) जन्मोत्सव - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


३० एप्रिल २०२१

५ मे ला अनसूया मातेचा (देऊळ बंद ) जन्मोत्सव
लक्ष्मी स्वरूपा पारडसिंगा निवासिनी अनसूया मातेचा ९५ वा जन्मोत्सव कार्यक्रम बुधवार दिनांक ५ मे २०२१ रोजी अनसूया माता मंदिर शांती विद्याभावंन परिसर येथे डिंगडोह midc नागपूर (देऊळ बंद) धार्मिक उत्सव संस्थेचे पदाधिकारी व पुजारी ह्यांच्या उपस्थितीत आयोजित केला आहे
सकाळी ७:०० वाजता मातेचे मंगल स्नान व महाआराती दुपारी१२:०० वाजता छप्पन भोग व प्रसाद तसेच सायंकाळी ७:००वाजता महाआरती व महाप्रसाद चे आयोजन केले आहे करोना महामारी बघता शासनाने दिलेल्या मार्ग दर्शनाखाली हा सोहळा पार पडेल भक्तांनी आपल्या घरीच मातेची सेवा रुजू करावी असे आयोजक दिलीप पनकुले व परिवार ह्यांनी ह्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे