भद्रावतीच्या मंडळ अधिकार्‍यास लाच घेतांना पकडले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०१ एप्रिल २०२१

भद्रावतीच्या मंडळ अधिकार्‍यास लाच घेतांना पकडले

तहसिल कार्यालय भद्रावती जि . चंद्रपूर येथील मंडळ अधिकारी यांचेवर अॅन्टी करप्शन ब्युरोची कारवाई तहसिल कार्यालय भद्रावती , जि . चंद्रपूर येथील मंडळ अधिकारी , प्रशांत नरेद्रप्रतापसिंह बैस , वय ५१ वर्षे , यांनी १,५०० / - रूपयांची लाच रक्कम स्विकारल्याने त्यांच्याविरूध्द् अॅन्टी करप्शन ब्युरोने गुन्हा दाखल केला आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की , यातील तकारदार हे चंद्रपूर येथील रहीवासी असुन त्यांनी साजा चंद्रनखेडा मौजा चरूर घारापुरी येथील सर्वे नं . १२ ९ / २ मधील १ हेक्टर ६२ आर जमीन खरेदी केली असुन सदर खरेदी केलेले जमीनीचे फेरफार करून देण्याचे कामाकरिता तक्रारदार यांनी तहसिल कार्यालय येथे रितसर अर्ज केला होता . त्या कामासाठी तक्रारदार हे तहसिल कार्यालय भद्रावती जि . चंद्रपूर येथील मंडळ अधिकारी प्रशांत बैस यांना भेटल असता त्यांनी तक्रारदाराचे जमीनीचे फेरफार करून देण्याचे कामाकरिता २,००० / - रू लाचेची मागणी केली . तक्रारदार यांना मंडळ अधिकारी प्रशांत बैस यास लाच रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , चंद्रपूर येथील अधिकाऱ्यांना भेटुन तक्रार नोंदविली . तकारदाराने दिलेल्या तकारीची पोलीस उपअधिक्षक श्री अविनाश भामरे यांनी अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले . त्यामध्ये दिनांक ०१/०४/२०२१ रोजी पडताळणी दरम्यान मंडळ अधिकारी प्रशांत बैस यांनी तक्रारदाराचे जमीनीचे फेरफार करून देण्याचे कामाकरिता २,००० / - रू लाचेची मागणी करून तडजोडअंती १५०० / - रू लाच रक्कम स्विकारल्याने त्यांना अॅन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात पकडले . त्यावरून आरोपी विरूध्द पोलीस स्टेशन भद्रावती जि . चंद्रपूर येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे . सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीमती रश्मि नांदेडकर व अपर पोलीस अधीक्षक श्री मिलींद तोतर , अॅन्टी करप्शन ब्युरो , नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक श्री . अविनाश भामरे , ला.प्र.वि. चंद्रपूर , पोहवा मनोहर एकोणकर , नापोकों . अजय बागेसर , संतोष येलपूलवार , पो.कॉ , रोशन चांदेकर , रवि ढेगळे , समिक्षा भोगळे चापोकों सतिश सिडाम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , चंद्रपूर हे करित आहेत .