आणखी धक्कादायक : अनिल देशमुख यांनी सचिन वाझेकडून मागितले 2 कोटी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ एप्रिल २०२१

आणखी धक्कादायक : अनिल देशमुख यांनी सचिन वाझेकडून मागितले 2 कोटी

 


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नियुक्तीसाठी दोन कोटी रुपये मागितले, असा आरोप सचिन वाझे यांनी केला आहे. वाझे यांनी याबाबत एक पत्रही लिहिले आहे. या पत्रात महाविकास आघाडीच्या दोन मंत्र्यांवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. वाझे यांनी NIA च्या कस्टडीत बसून त्यांच्या वकिलांसमोर हे पत्र लिहिल्याची माहिती समोर आली आहे. वाझे यांचं निलंबन झालं तेव्हा स्वत: देशमुख यांनी त्यांना फोन केला होता. यावेळी परत सेवेत घेण्यासाठी गृहमंत्र्यांनी दोन कोटी रुपये मागितले, असा आरोप वाझेंनी केला आहे. एकूण तीन पानांचं हे पत्र आहे.