दुःखद बातमी : माजी पालकमंत्री संजय देवतळे यांचे निधन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२५ एप्रिल २०२१

दुःखद बातमी : माजी पालकमंत्री संजय देवतळे यांचे निधन





चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री श्री संजयबाबू देवतळे, यांचे आज नागपूर येथे उपचारा दरम्यान नागपूर येथे कोरोनाने निधन झाले. 

चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामचंद्र उपाख्य दादासाहेब देवतळे यांचा वरोरा हा हक्काचा मतदारसंघ. त्यांचे पुत्र डॉ. विजय देवतळे शिक्षणासाठी परदेशी राहत असल्याने त्यांच्या निधनानंतर दादासाहेबांचे पुतणे संजय देवतळे त्यांचे राजकीय वारसदार म्हणून पुढे आले. वरोरा मतदारसंघावर हक्क प्रस्थापित केला. संजय देवतळे यांचा वरोरा हा गड राहिला. गेल्या २० वर्षांपासून त्यांनी या मतदारसंघात दबदबा कायम ठेवला होता. या मतदारसंघाच्या माध्यमातून आमदार आणि मंत्रिपदही मिळविले. 

काँग्रेसने विधानसभेसाठी ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य व पर्यावरणमंत्री संजय देवतळे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला. निवडणूक लढली. पण, घरातच लढा द्यावा लागल्याने त्यांचा पराभव झाला.

भद्रावती येथील ग्रामउद्योग कार्यक्रमासाठी नितीन गडकरी आले होते. त्या कार्यक्रमानंतर उमरेड मार्ग ते बेला येथे जात असताना संजय देवतळे यांच्याकडे चहापानासाठी आले. यावेळी त्यांनी संजय देवतळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली व भाजपमध्ये यावे व आपण जोमाने काम करावे, अशी सूचना केली. त्यानंतर लगेच भाजपामध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला.

 यावेळी भाजपा नेते बाबासाहेब भागडे नगराध्यक्ष अहेतेशाम अली, अन्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वरोडा विधानसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीमध्ये भाजपला जागा निश्चित मिळेल अशी शक्यता असताना ऐनवेळी ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार संजय देवतळे यांना धनुष्यबाण हातात घेऊन विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

आज नागपूर येथे उपचारा दरम्यान नागपूर येथे कोरोनाने निधन झाले.  

---------------------------


शांत, सुस्‍वभावी, सुसंस्कृत नेता हरपला – आ. सुधीर मुनगंटीवार

राज्‍याचे माजी मंत्री संजय देवतळे यांच्‍या निधनाने शांत, सुस्‍वभावी, सुसंस्कृत नेता हरपल्‍याची शोकभावना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे.

संजय देवतळे यांच्‍या निधनाची बातमी धक्‍कादायक असुन या बातमीवर विश्‍वासच बसत नाही. विधानसभा सदस्‍य म्‍हणुन त्‍यांनी दीर्घकाळ जनतेची सेवा केली आहे. अतिशय शांतपणे, संयमितपणे जनतेचे प्रश्‍न विधानसभाग़हात मांडणारा अभ्‍यासु लोकप्रतिनिधी म्‍हणुन त्‍यांनी आपली ओळख निर्माण केली होती. पर्यावरण व सांस्कृतिक कार्य मंत्री तसेच चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री  म्‍हणुन त्‍यांनी उत्‍तम कामगिरी बजावली. त्‍यांच्‍या निधनाने चंद्रपूर जिल्‍हयाच्‍या राजकीय, सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. परमेश्‍वर त्‍यांच्‍या कुटुंबियांना या दु’खातुन सावरण्‍याचे बळ देवो असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.

-------------------

अत्यंत लोकप्रिय निष्कलंक राजकीय जीवन जगनारे,  फार जवळीक असणारे विश्वासु व  जिव्हाळ्याचे मित्र सहकारी संजय देवतळे यांच्या रूपात गमावला - हंसराज अहीर, पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री


       अत्यंत लोकप्रिय निष्कलंक राजकीय जीवन जगनारे, गेली ७ - ८ वर्षांपासून फार जवळीक असणारे विश्वासु व  जिव्हाळ्याचे मित्र सहकारी च्या रूपात संजय देवतळे  गेल्याने अतीव दुःख झाले. हि न भरून निघणारी हानी आहे, नेहमीच स्मरणात राहील असं व्यक्तिमत्व आम्ही गमावल अशी भावपूर्ण प्रतिक्रिया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी पूर्व पालकमंत्री तसेच भाजपचे जेष्ठ नेते संजय देवतळे यांच्या निधन वार्ता नंतर दिली आहे. नागपूर येथील रुग्णालयात कोविड शी लढतांना संजय देवतळे यांचे निधन झाले आहे. 

    

     राजकारण व समाजकारणात अनेक नावे असतात मात्र राजकारणाच्या पलीकडे जनमानसात आपली ओळख निर्माण करून जगणारे नेते हे क्वचितच आढळतात त्यातील एक उदाहरण म्हणजे स्व. संजय देवतळे हे आहेत. त्यांच्यावर कोरोनाने घातलेला आघामुळे चंद्रपूर जिल्ह्याने एका सच्चा नेत्याला गमावले आहे त्यांचे असे जाने भाजपा व  जिल्ह्यातील नागरिकांची ची न भरून निघणारी हानी आहे. ईशर त्यांच्या आत्म्याला शांति देवो व त्यांच्या परिवाराला हा मोठा आघात सहन करण्याची ताकद देवो अशी प्रतिक्रिया पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर  यांनी दिली.  


     वरोरा विधानसभेत त्यांनी केलेली जनसेवा हि सदैवच तेथील नागरिकांच्या व सर्व नेत्यांच्या स्मरणात असेल. त्यांच्यासारखा नेता हा वरोरा विधानसभेत दुसरा होणे नाही अशी त्यांनी या विधानसभेतील नागरिकांच्या मनात छाप सोडलेली आहे. आमदार ते राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हा त्यांचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे असे यावेळी हंसराज अहीर यांनी सांगितले. 


     देवतळे साहेब म्हणजे मृद भाषी, शांत व संयमी  स्वभावाचे धनी असल्याने जनमानसाच्या मनात त्यांच्याविषयी अपार आदर बघायला मिळायचा व त्यांच्या या गुण कौशल्याचा आपल्यालाही आकर्षण होते असेही अहीर यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून सांगितले. 


    संजय देवतळे यांनी आपल्या विरोधांत निवडणूक सुद्धा लढवली मात्र जिल्ह्यातील राजकारणाची गरिमा नेहमीच लक्षात घेत त्यांनी शब्दांच्या गरिमेचा बाण कधीच तुटू दिला नाही याबद्दल त्यांचा नेहमीच आदर वाटतो. त्यांच्या सह निवडणुकी लढविण्याचा अनुभव सुद्धा जीवनात नेहमीच आठवणींचा राहील त्यांच्या सारखा नेता होणे नाही   अशी भाव प्रतिक्रिया सुद्धा यावेळी हंसराज अहीर यांनी व्यक्त केली.