आदित्य हिरोतर्फे मनपाच्या डॉक्टरांना ३०० पीपीई किट भेट - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०६ एप्रिल २०२१

आदित्य हिरोतर्फे मनपाच्या डॉक्टरांना ३०० पीपीई किट भेट

 

आदित्य हिरोतर्फे मनपाच्या डॉक्टरांना ३०० पीपीई किट भेट

 

नागपूर, ता.०६ : सध्या नागपूर शहरात कोरोना प्रादुर्भावाच्या विरोधात डॉक्टर्स महत्वाची भूमिका बजावत आहेत. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रात्रं दिवस कोरोना रुग्णांना सेवा देत आहेत. त्यामुळे डॉक्टरांना सुध्दा सुरक्षा मिळावी यासाठी हिरो मोटो कॉर्प सीएसआर प्रोग्राम अंतर्गत कंपनीच्या वतीने आदित्य हिरो तर्फे नागपूर महानगरपालिकेच्या डॉक्टर व आरोग्य सेवेतील कर्मचा-यांकरीता ३०० पीपीई किट मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याकडे सुपूर्द केल्या.

            यावेळी पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरेराष्ट्रवादी काँग्रेस नागपूर अर्बन सेलच्या अध्यक्षा ज्वाला धोटेवरिष्ठ क्षेत्र व्‍यवस्थापक निलेश बोरडेआदित्य ऑटो एजन्सीचे डॉ. प्रकाश जैन उपस्थित होते.

            यापूर्वीही आदित्य हिरो तर्फे शहरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचे गांभीर्य लक्षात घेत हजारो मास्क आणि ३ मोबिक रुग्णवाहिका दिल्या होत्या. आणि आता कोरोना रुग्णांना सेवा देत असलेल्या डॉक्टरांसाठी ३०० पीपीई किट दिल्या आहेत. याबद्दल महापौर दयाशंकर तिवारी यांनी विशेष पुढाकार घेतला होता. महापौर दयाशंकर तिवारी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी एचएमसीएल आणि आदित्य ऑटो एजन्सीचे डॉ आदित्य जैन यांचे त्यासाठी आभार मानले.