राजकीय नेत्यांचं ठरलं : महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० एप्रिल २०२१

राजकीय नेत्यांचं ठरलं : महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनकोरोना संदर्भात बैठक : महाराष्ट्रात लाॅकडाऊन संदर्भात सर्व पक्षांचं एकमत... टाॅक्स फोर्सच्या बैठकीत लाॅकडाऊनचा निर्णय होणार :- मुख्यमंत्री

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच्या बैठकीत लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, लसीकरणाचा वेग आपण वाढवतोय. पण किमान आठ दिवस कडक निर्बंध लावू,असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 राज्यात कोरोनाची स्थिती बिकट होत असताना मुख्यमंत्र्यांनी आज लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्व पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत हे मत मांडलं आहे. यावर अनेक नेत्यांनी ही पाठिंबा दर्शवला आहे. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी व कोरोना संदर्भात इतर उपाययोजना याबाबत मा.मुख्यमंत्री यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडलेल्या बैठकीत कडक लॉकडाऊन लावण्याची मागणी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.