कोरोनाने नायब तहसीलदाराचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१८ एप्रिल २०२१

कोरोनाने नायब तहसीलदाराचा मृत्यू

चंद्रपूर/खबरबात:
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील नायब तहसिलदार अशोक सलामे यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 54 वर्षीय अशोक सलामे हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून वरोरा येथील तहसील कार्यालयात नायब तहसिलदार पदावर कार्यरत होते. वरोरा तालुक्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत असून वरोरा तालुक्यात जनता कर्फ्यु सुरू आहे. अशातच तेथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अनेक अधिकारी व कर्मचारी कोरोना पोसीटीव्ह आले होते. अशातच 54 वर्षीय नायब तहसिलदार अशोक सलामे हे सुद्धा कोरोना ग्रस्त झाले होते. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान त्यांचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे