ऑक्सीजन बेड न मिळाल्यामुळे चंद्रपुरात पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


२२ एप्रिल २०२१

ऑक्सीजन बेड न मिळाल्यामुळे चंद्रपुरात पत्नीच्या डोळ्यादेखत पतीचा मृत्यू

चंद्रपूर/खबरबात(ललित लांजेवार):
कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला असून दवाखान्यात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर ची कमतरता भासू लागली आहे अशातच चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा या गावातील एका 65 वर्षीय वृद्ध व्यक्ति चंद्रपुरातील शासकीय कोविड रुग्णालयात उपचारासाठी आले होते. मात्र त्यांना वेळेवर ऑक्सीजन बेड उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.


अनेक प्रयत्न केले मात्र ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध होऊ शकला नाही. शेवटी त्याने एका झाडाखाली आसरा घेतला होता. मात्र अशा बिकट परिस्थितीत वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्यांचा झाडाखालीच बसल्या ठिकाणी पत्नीचा डोळ्यासमोर मृत्यू झाला.
आठवड्याभरात चंद्रपूरतील ऑक्सिजन अभावी होणारा हा चौथा मृत्यू आहे