चंद्रपूर: दिवसभर दवाखाने फिरले: नंतरही बेड न मिळू शकल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णाचा आपल्या गाडीतच मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत


१९ एप्रिल २०२१

चंद्रपूर: दिवसभर दवाखाने फिरले: नंतरही बेड न मिळू शकल्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णाचा आपल्या गाडीतच मृत्यू

चंद्रपुरात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे दवाखान्यासाठी भटकंती केल्यानंतरही बेड मिळू शकला नाही. आणि त्यानंतर कोरोना ग्रस्त रुग्णाला स्वतःच्याच गाडीतच आपले प्राण सोडावे लागले.

चंद्रपूरातील नगीनाबाग परिसरातील 40 वर्षीय व्यक्तीचा उपचारासाठी बेड न मिळाल्याने त्यांच्यातच गाडीत मृत्यू झाल्याची दुःखद घटना चंद्रपुरात सोमवारच्या पहाटे घडली.


सध्या सर्वत्र कोरोणाने थैमान घातले असून अनेक घरातली कर्ती व्यक्ती जात असल्यामुळे परिवारा वर शोककळा पसर त आहे. यासोबत आरोग्य व्यवस्था देखील कोलमडली असून ऑक्सिजन व्हेंटिलेटर नसल्यामुळे रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहे.  मृत्यूनंतर नातेवाईकांनी शासकीय कोव्हिड रुग्णालय परिसरातच टाहो फोडला.

काल ब्रह्मपुरी त देखील पॉझिटिव्ह रुग्णाला उपचारासाठी बेड न मिळाल्यामुळे बस स्टैंड वर आपला जीव सोडावा लागला होता तर चंद्रपुरात देखील उपचारासाठी बे ड न मिळाल्यामुळे दुर्गे यांना आपल्या गाडीतच जीव सोडावा लागल्याची दुःखद घटना घडली आहे.