काँग्रेस नेते रामू तिवारी यांचे मनपावर ताशेरे, गेल्या चौदा महिन्यात चंद्रपुरात एकही दवाखाना मनपाने काढला नाही: रामू तिवारी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१६ एप्रिल २०२१

काँग्रेस नेते रामू तिवारी यांचे मनपावर ताशेरे, गेल्या चौदा महिन्यात चंद्रपुरात एकही दवाखाना मनपाने काढला नाही: रामू तिवारी


चंद्रपूर/खबरबात:https://youtu.be/H9rRNf7W07M
डिसेंबर नंतर मंदावलेल्या कोरोनाने पुन्हा मार्च येताच डोकं वर काढलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा चंद्रपूर शहरात वाढत जात आहे.अशातच जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुविधा केल्या जात असल्या तरी मात्र त्या अपूर्ण पडत आहे.


 कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता गेल्या चौदा महिन्यात चंद्रपूर शहर महानगरपालिकेने एकही दवाखाना व्यवस्थित उभारला नाही. चंद्रपूरकरांना त्यात उपचार घेता आले नाही. ऑक्सिजनची कमतरता व्हेंटिलेटरची कमतरता आणि रेमडीसिवर इंजेक्शनची देखील कमतरता आज चंद्रपुरात जाणवत आहे. रेमडीसिवर मेडिसिन प्रत्येकाला मिळावी यासाठी लोक गर्दी करू लागले आहेत. मात्र हे सर्व नियोजन करण्यास चंद्रपूर महानगरपालिका अपेशी ठरत आहे. असा आरोप चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष रामू तिवारी यांनी केला आहे.