बंगाली कॅम्प प्रभागातील महिलांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत१५ एप्रिल २०२१

बंगाली कॅम्प प्रभागातील महिलांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश
कोरोनाच्या काळात नागरिकांच्या समस्या सोडविण्यात कार्यकर्त्यांनी तत्पर असावे- डॉ.मंगेश गुलवाडे
भारतीय जनता पार्टी चंद्रपुर महानगर जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वात चंद्रपुर शहरातील बंगाली कॅम्प प्रभागातील महिलांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. डॉ मंगेश गुलवाडे यांनी यावेळी सांगितले की भारतीय जनता पक्षाचे ध्येय धोरण सामान्य नागरिकांपर्यत पोहचवून या कोरोनाच्या काळात नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे त्यांनी यावेळी सांगितले.पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये कावेरी शहा,उन्नती मंडल, गीता मिस्त्री,रीना डाकूआ,मीना मंडल व संजय शहा ,गोपाल सरकार,राजेश येमेवार,नकुल दास यांचा समावेश होता.पक्ष प्रवेश जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,भाजप महानगर उपाध्यक्ष रामपाल सिंग, भाजप सचिव रामकुमार आक्कपेल्लीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले