चंद्रपूर:कोव्हिड बेड्सची माहिती आता एका क्लिकवर - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत२२ एप्रिल २०२१

चंद्रपूर:कोव्हिड बेड्सची माहिती आता एका क्लिकवर


चंद्रपूर/खबरबात (ललित लांजेवार):
चंद्रपूर शहरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. कोरोना बाधितांचा वाढता प्रभाव लक्षात घेता शहरातील विविध खाजगी व शासकीय रुग्णालय मिळून बाधितांसाठी किती बेडस उपलब्ध आहे याची माहिती देण्यासाठी चंद्रपूर मनपा व आरोग्य विभागाच्यावतीने सॉफ्टवेयर तयार केला आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर उपलब्ध आई.सी.यू. ऑक्सीजन, व्हेंटीलेटर, खाटांची माहिती प्राप्त होईल. या सोयीमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

चंद्रपुरात सध्यास्थितीत रुग्णालयांमध्ये बेडसची उपलब्धता ऑक्सीजन बेड, आई.सी.यू. बेड, व्हेंटीलेटर बेडस चा तक्ता दर्शविणारा हा सॉफ्टवेयर नागरिकांना त्यांचे निकटवर्तीयांसाठी मोठा आधार ठरनार आहे. रुग्णालयांना सॉफ्टवेयरचे लॉगिन आई डी देण्यात आले आहे. रुग्णालयाचे ऑपरेटरला नवीन पेशंट आला किंवा बेड रिकामा झाला याची माहिती या साफ्टवेयरवर अपडेट करायची आहे.

ही माहिती नागरिकांसाठी डॅशबोर्ड वर रीयल टाईम दाखविली जाईल. संबंधीत व्यक्ती आपल्या गरजेनुसार रुग्णालयांमध्ये कोरोना बाधितांना फोन वरून बोलून किव्हा माहिती घेऊन दाखल करु शकतो.

जिल्ह्यातील बेडची संख्या जाणून घेण्यासाठी https://www.ccmcchandrapur.com/hospital/  वर क्लिक करुन माहिती घेता येईल. #khabarbat.in