वरोरा-भद्रावती तालुक्यातील 250 कोरोना पॉझिटिव्ह; तर 5 बाधितांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

११ एप्रिल २०२१

वरोरा-भद्रावती तालुक्यातील 250 कोरोना पॉझिटिव्ह; तर 5 बाधितांचा मृत्यूशिरीष उगे (वरोरा/भद्रावती) : 

वरोर्यात व भद्रावती मध्ये कोरोना बाधितांचा आकड्यात वाढ होत आहे तर मृतकांचे प्रमाणात ही वाढ होतांनाचे दिसत आहे.  या चे गांभीर्य तालुक्यातील स्वतःची व कुटुंबाची जबाबदारी घ्यावी. मास्क लावा, सॅनिटाझर वापरा, सतत हात धूत राहावे, दोघांमध्ये अंतर ठेवावे. प्रशासनाने ही या कडे विशेष लक्ष द्यावे. 

           आज मृत झालेल्यामध्ये  बावणे लेआऊट वरोरा येथील 51 वर्षीय पुरुष, शेगाव ता. वरोरा येथील 50 वर्षीय पुरुष,  गौराळा ता. भद्रावती येथील 55 वर्षीय महिला, ख्रिस्तानंद चौक भद्रावती येथील 42 वर्षे पुरुष, संताजी नगर भद्रावती येथील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

        वरोरा-भद्रावती तालुक्यात आज बाधीत आलेल्या 250 रुग्णांमध्ये भद्रावती 22, वरोरा 228  रुग्णांचा समावेश आहे. वरोर्यात आज पर्यंत प्रथमच पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून रोज रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे चिन्ह दिसत आहे.  या तालुक्याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची वरोरा-भद्रावती वासियांचे म्हणणे आहे.