यंग चांदा ब्रिगेेडच्या वतीने कोरोना लसीकरण केंद्राना भेट देत कर्मचा-यांचे अभिनंदन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२४ मार्च २०२१

यंग चांदा ब्रिगेेडच्या वतीने कोरोना लसीकरण केंद्राना भेट देत कर्मचा-यांचे अभिनंदन

 यंग चांदा ब्रिगेेडच्या वतीने कोरोना लसीकरण केंद्राना भेट देत कर्मचा-यांचे  अभिनंदनकोरोनाचा प्रादूर्भाव नियत्रंणात आणण्यासाठी कोरोना लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. दरम्याण यंग चांदा ब्रिगेेडच्या कार्यकर्त्यांनी  सदर लसीकरण केेंद्रांना भेटी देत येथील कर्मचा-यांना अभिनंदन पत्र देत त्यांच्या कामाचे कौतूक केले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, युवती प्रमूख भाग्येश्री हांडे, दुर्गा वैरागडे, प्राची निंनावे, आशा देशमूख, चंदा वैरागडे यांच्यासह इतर पदाधिका-यांची उपस्थिती होती.
  चंद्रपूरात 45 वर्षावरील व्यादीग्रस्त व 60 वर्षावरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण केेंद्र सुरु करण्यात  आले आहे. या केंद्रावर डाॅक्टर, वैदयकीय कर्मचारी सेवा देत असून लसीकरणाचे काम उत्तम रित्या पार पाडत आहे. अशात या कर्मचा-यांच्या अडचणी समजून त्यांचे अभिनंदन करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शहरातील इंदिरा नगर, बाबूपेठ, शासकीय वैद्यकीय रुग्णालय चंद्रपूर, कोव्हीड सेंटर या लसीकरण केंद्रांना भेटी दिल्यात. यावेळी अभिनंदन पत्र देवून या कर्मचा-यांचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी येथील कर्मचा-यांच्या अडचणीही जाणून घेण्यात आल्या असून त्या आमदार किशोर जोरगेवार यांच्या पर्यत्न पोहचविण्यात आल्या आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनीही त्या सोडविण्याच्या दिशेने पर्यत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.