नवेगावबांध वनक्षेत्रात जागतिक वन दिवस साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ मार्च २०२१

नवेगावबांध वनक्षेत्रात जागतिक वन दिवस साजरा

नवेगावबांध वनक्षेत्रात जागतिक वन दिवस साजरा
संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि.22 मार्च:-


वन विभाग गोंदिया अंतर्गत वनक्षेत्र नवेगावबांध (प्रादेशिक) यांच्या कार्यक्षेत्रात ज्या गावात संयुक्त वन व्यवस्थापन समिती आहेत. अशा गावात जागतिक वन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वनांचे मानवी जीवनात महत्त्व, मानव व वन्यजीव संघर्ष, वन वणवा याबाबत जनजागृती करण्यात आली .जंगलांबाबत आस्था आणि जंगलतोडीमुळे होणा-या हवामानातील बदलांबद्दल चिंता वाटत असणा-या सर्वांना जागतिक पातळीवर व्यासपीठ मिळावे हा वनदिन साजरा करण्यामागचा उद्देश आहे. बदलत्या हवामानावर भविष्यात उपाययोजना करताना आणि धोरण ठरवताना जंगलांबाबत योग्य विचार होत असल्याची खात्री या मंचावरून एकत्रितपणे करता येईल.या साठी वन दिवस साजरा केला जातो.

सहवनक्षेत्र बाराभाटी अंतर्गत सोमलपूर येथे जागतिक वन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी वनक्षेत्रधिकारी रोशन दोनोडे नवेगावबांध ,सहवनक्षेत्रधिकारी करंजेकर बाराभाटी प्रामुख्याने उपस्थित होते.भिवखिडकी येथेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाला संयुक्त वनव्यवस्थापन समिती सोमलपूर व भिवखिडकी चे पदाधिकारी व ग्रामवाशी उपस्थित होते. अनावश्यक जंगलतोड टाळणे.अधिक झाडे लावणे.जंगलांपासून मिळणारी उत्पादने आणि होणारे फायदे,जंगलांना सतत भेट दिल्याने मिळणारी माहिती या बाबत जागतिक वन दिवसा निमित्त जनजागृती करण्यात आली.