श्री शिव छत्रपती कॉलेज, जुन्नर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०९ मार्च २०२१

श्री शिव छत्रपती कॉलेज, जुन्नर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

 श्री शिव छत्रपती कॉलेज, जुन्नर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
जुन्नर /वार्ताहर 

     जुन्नर येथील श्री शिव छत्रपती कॉलेजच्या राजमाता जिजाऊ महिला अभ्यासकेंद्र व राष्ट्रीय सेवा योजना तर्फे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.चंद्रकांत मंडलिक अध्यक्षीय मनोगतात म्हणाले की फुले दांपत्यांमुळे स्त्री शिक्षित झाली व कुटुंबाची जबाबदारी नोकरी करून पेलू लागली. स्त्रीयांनी कुटुंबाबरोबरच देशाचे व जगाचे  नेतृत्व केले आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करतांना त्यांनी गुणवत्ता दाखवून दिलेली आहे. जगावर व देशावर ओढवलेल्या संकटात महिलांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. त्यांनी हिरीरीने पुढे येऊन करोना मुक्ती कामात मदत केली. महिलांना कमी न लेखता  पुरूष प्रधान कुटुंबात महिलांचा आदर केला पाहिजे असे ते म्हणाले.

     या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्या डॉ अरुणा वाघोले यांनी सांगितले की, महिलांनी विविध क्षेत्रात आपली भूमिका बजावली आहे. भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यात दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. त्याच रोबर कला, वाणिज्य, शास्त्र, कायदा, संशोधन, अवकाश आणि डिफेन्स इत्यादी क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात अनेक विद्यापीठांना महिलांची नावे देण्यात आली आहे उदा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,अहिल्याबाई होळकर विद्यापीठ.

     कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.वंदना नढे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जावेद शेख यांनी केले तर आभार एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा.विक्रम रसाळ यांनी मानले.