नवेगावबांध येथे महिला दिन उत्साहात साजरा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०९ मार्च २०२१

नवेगावबांध येथे महिला दिन उत्साहात साजरा

नवेगावबांध येथे महिला दिन उत्साहात साजराक्रांती चौकात आयोजन

महिलांनी घेतला उत्स्फूर्त सहभागसंजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.9 मार्च:-

नवेगावबांध येथील प्रभाग क्रमांक १ मधील (क्रांती चौक) येथे दिनांक ८ मार्च, २०२१ रोज सोमवार ला रात्री ८.०० वाजता महिला जागतिक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शितलताई राऊत, ग्रामपंचायत सदस्या हया होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनंदाताई कौरेटी, अशोक बन्सोड, अंबादास शहारे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वलीत करुन झाली. सुनंदाताई येल्ले, लता जिभकाटे, शायली शहारे, सुप्रिया डोंगरे, रेखा शहारे, वैशाली ताई जिभकाटे, लिलाताई सांगोळकर, शितलताई राऊत, यांनी महिला जागतिक दिनानिमित्त उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले
अशोक बन्सोड यांनीही महिला जागतिक दिनानिमित्त मोलाचे मार्गदर्शन केले. तर कुमार श्रेयस येल्ले, लता जिभकाटे, यांनी गीत गायन केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सपना बन्सोड यांनी केले.तर आभारप्रदर्शन सुनंदाताई येल्ले यांनी केले.