महिलांना पावडा व हातोड्याने मारहाण - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२४ मार्च २०२१

महिलांना पावडा व हातोड्याने मारहाण

महिलांना विवस्त्र करून मारहाण करणाऱ्या त्या दोघांना तात्काळ अटक करा - नारी शक्ती महिला संघटनेचं जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन


चंद्रपूर - मुक्ती कॉलनी परिसरात विटा टाकण्याच्या क्षुल्लक कारणातून 2 महिलांना पावडा व हातोड्याने बेदम मारहाण करण्यात आली, मात्र या गंभीर प्रकरणात पोलिसांचा बेजबाबदार पण बघायला मिळाला.

महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत असून सुद्धा पोलीस प्रशासन अश्या प्रकरणात आरोपींवर गुन्हे दाखल करायला सुद्धा मागे पुढे बघत असतात जेणेकरून आरोपींची हिंमत पुन्हा वाढत असते.

मुक्ती कॉलनी परिसरातील रीमा बोन्डे व दीपिका बिश्वास या दोघा महिलांना सतीश रॉय व सुजित रॉय यांनी पावडा व हातोड्याने जोरदार प्रहार केले, इतक्यावर ते दोघे थांबले नाही तर रीमा बोन्डे ला जमिनीवर पाडत तिला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली.

पोलिसांनी या प्रकरणात पीडित महिलांची साक्ष नोंदवायला हवी होती. मात्र घटनेला 5 दिवस उलटल्यावर सुद्धा पोलिसांनी त्या महिलांकडे ढुंकूनही बघितले नाही.

महिलांना विवस्त्र करून मारहाण करणाऱ्या रॉय बंधूवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी नारी शक्ती महिला संघटनेच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांना करण्यात आली, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तात्काळ या गंभीर प्रकरणाची दखल घेत तात्काळ गुन्हे दाखल करून चौकशी करण्याचे निर्देश रामनगर पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांना केली. यावेळी अध्यक्ष सुनीता गायकवाड,उपाध्यक्ष सायली येरने,सचिव ऍड विना बोरकर,संतोषी चौहान, अर्चना आमटे,अल्का मेश्राम,पूजा शेरकी,रूपा परशराम,प्रतिभा लोनगाडगे,माला पेदाम,गीता येडे इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती होती