व्हाट्सएप पाऊणतास बंद #whatsappdown - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१९ मार्च २०२१

व्हाट्सएप पाऊणतास बंद #whatsappdown


रात्री १०.५५ वाजताची वेळ.. अचानक व्हाट्सएप बंद पडलं. इंटरनेट सेवा बंद झाली समजून अनेक जण सिग्नल चेक करू लागलेत. वाईफाय बंद करून चालू केलेत. पण व्हाट्सएप सुरु होईना. दुसरीकडे फेसबुक आणि इंस्टाग्राम देखील व्यवस्थित चालत नव्हते. व्हाईस मेसेजिंग, व्हिडीओ शेअरिंग, ग्रुप चॅट हे सर्व फिचर्स सर्वकाही अचानकपणे बंद पडले आहेत. सर्वर डाउन झाल्याने जगभरातील वॉट्सएपचे करोड़ों यूजर्स नाराज झालेत. ट्विटरवर #whatsappdown चा ट्रेण्ड सुरु झाला. 
 

सर्व्हर बंद पडल्यामुळे या सगळ्या सुविधा बंद झाल्या आहेत. मेसेजिंग, व्हिडीओ कॉल, ग्रूप चॅट, ग्रूप व्हिडीओ कॉल ही सर्व फिचर्स बंद पडली आहेत. हा प्रकार साधारण शुक्रवारी ( 19 मार्च) रात्री 10.55 च्या सुमारास समोर आल्यामुळे ट्विटरवर व्हॉट्सअ‌ॅप डाऊनचा ट्रेण्ड काही क्षणांत सुरु झाला आहे. एवढ्या मोठ्या कालावधीसाठी व्हॉट्सअ‌ॅप बंद पडण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा व्हॉट्सअ‌ॅप बंद पडण्यामागचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही. ११. ३६ वाजता व्हॉटसएप सुरु झाले.