केक कापून केले महिला दिनाचे स्वागत - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०९ मार्च २०२१

केक कापून केले महिला दिनाचे स्वागत

 केक कापून केले महिला दिनाचे स्वागत

 


अर्जुनी-मोर तहसील कार्यालयात महिला दिन थाटामाटात साजरा

केक भरवून दिल्या शुभेच्छा.संजीव बडोले प्रतिनिधी.


 नवेगावबांध दि. 9 मार्च:-

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दिनांक आठ मार्च रोज सोमवारला तहसील कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी सर्व महिला कर्मचारी यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्या करीता कार्यक्रम आयोजित केला होता. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांचे हस्ते केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी अर्जुनी-मोर चे तहसीलदार विनोद मेश्राम, परिविक्षाधिन नायब तहसीलदार मनीषा देशमुख आणि तहसील कार्यालयातील सर्व महिला कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा केला. उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी उपस्थित महिलांना केक भरवून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्या नंतर अल्पोपहारानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला तहसील कार्यालयातील अधिकारी व महिला कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.