नवेगावबांध येथील गुरुवारचा आठवडी बाजार बंद - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ मार्च २०२१

नवेगावबांध येथील गुरुवारचा आठवडी बाजार बंद

 नवेगावबांध येथील गुरुवारचा आठवडी बाजार बंदकोरोना चा वाढता प्रभाव
संजीव बडोले प्रतिनिधी.


नवेगावबांध दि. 31मार्च:-


कोरोनाच्या वाढता प्रभाव लक्षात घेऊन नवेगाव बांध येथील दर आठवड्याला गुरुवारी भरणारा आठवडी बाजार दिनांक एक एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आला आहे.

शासन नियमानुसार covid-19  कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन ,सार्वजनिक ठिकाणी विना मास्क, पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तीस एकत्र जमण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. म्हणून आज दिनांक 31 मार्च रोजी बुधवारला उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी अर्जुनी मोरगाव यांनी मौजा नवेगावबांध येथील गुरुवारला भरविण्यात येणाऱ्या आठवडी बाजार भरविण्यास मनाई केलेली आहे. त्यांच्या या भ्रमणध्वनी आदेशान्वये आज दिनांक 31 मार्च ला मौजा नवेगाव बांध येथील कोरूना समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावर दर गुरुवारला भरवण्यात येणारा आठवडी बाजार दिनांक एक एप्रिल पासून पुढील आदेशापर्यंत भरविण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे दर गुरुवारला गावातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने ,आस्थापने, किराणा, कपडा, मनेरी, हार्डवेअर, हॉटेल ,भोजनालय, भाजीपाला ,विक्रेते व इतर दुकाने बंद ठेवण्यात यावे. असे आवाहन ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच अनिरुद्ध  शहारे, ग्राम विकास अधिकारी परशुराम चव्हाण व तलाठी पुंडलिक कुंभरे यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे. ताकीद देऊनही दुकाने सुरू ठेवणाऱ्यावर कोरोना प्रतिबंधक कायदा व शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.