गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयाच्या नियामक मंडळ सदस्यपदी वेदांत मेहरकुळे यांची निवड - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०१ मार्च २०२१

गोंडपिपरी ग्रामीण रुग्णालयाच्या नियामक मंडळ सदस्यपदी वेदांत मेहरकुळे यांची निवड


गोंडपिपरी - तालुका प्रतिनिधी
स्थानिक ग्रामीण रुग्णालय येथील रुग्ण कल्याण नियामक मंडळाची फेरबदल करण्यात आलेल्या नियुक्ती प्रक्रियेदरम्यान क्षेत्र आमदार सुभाष धोटे यांचे नामनिर्देशित प्रतिनिधी म्हणून रुग्ण कल्याण नियामक मंडळाच्या सदस्यपदी वेदांत मेहरकुळे यांची नियुक्ती करण्यात आली.

98 गावाचा विस्तारित तालुका म्हणून ओळखला जाणारा जिल्हा सीमेवरील गोंडपिपरी तालुका हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त व अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. अशातच आरोग्य सेवा पुरवणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्र याबरोबरच परिसरातील मोठे रुग्णालय म्हणून ग्रामीण रुग्णालय गोंडपिंपरी कडे पाहण्यात येते. रुग्णांच्या आरोग्य समस्या, रुग्णालयातील इतर समस्या यांचे निराकरण करण्यासाठी शासनस्तरावरून रुग्ण कल्याण नियामक मंडळ अशी समिती स्थापन करण्यात येते. या कमिटीमध्ये शासन प्रतिनिधींसह अशासकीय सदस्य म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्र आमदार सुभाष धोटे यांनी नामनिर्देशित करणारे पत्रा द्वारे नियामक मंडळ सदस्यपदी वेदांत मेहरकुळे यांची नियुक्ती केली आहे त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.