जलजागृती अभासी पध्दतीने... - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१६ मार्च २०२१

जलजागृती अभासी पध्दतीने...

 जलजागृती अभासी पध्दतीने...लोकसहभागातून जलसमुध्दी हि संकल्पना घेवून दरवर्षी १६ ते २२ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असतो. जलजागृती सप्ताहाचे हे सहावे वर्ष असून या वर्षी १६ ते २२ मार्च या कालावधीत जलसंपदा विभाग व  भारतीय जलसंसाधन संस्था (IWRS) नागपूर केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी नागपूर जिल्ह्यामध्ये अनेक कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरा करण्यात आलेला आहे.

यावर्षी कोरोनाचे संकट पहाता नागपूरमध्ये लॅाकडाऊन आहे. दरवर्षी अति उत्साहात होणारा हा सोहळा अंत्यंत साधेपणाने व कोरोना नियंमांचे पालन करून खंड पडू नये म्हणून अभासी पध्दतीने साजरा करण्यात येत आहे. प्रत्येकजण  जल पूजन व जलशपथ घेवून या जलजागुतीत सहभागी झाले आहे. 
 
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ कार्यकारी संचालक राजेंद्र मोहिते यांनी जलजागृती सप्ताहा बद्दल सर्वाना शुभेच्छा देत पाणीच जीवन आहे असे सांगत जीवनात पाण्याचे महत्व विशद केलेराज्य शासन नुसत्याच योजना राबवून थांबले नाही तर पाणी हे किती अमूल्य आहे याबाबत जनजागृती करण्यासाठी शासनाने गेल्या पाच  वर्षीपासून जलजागृती सप्ताहाचे आयोजन सुरू केलेले आहे. या जलजागृती सप्ताहाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न जागोजागी केला जात आहे हि आनंदाची व समाधान देणारी आहे. सर्वसामान्य लोकांमध्ये पाण्याबाबत जागरुकता निर्माण करून पाण्याचा अपव्यय टाळण्यासह त्याचा काळजीपूर्वक वापर करण्याबाबत जागृती केली जाते. 
 

तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक ब. शं. स्वामी यांनी अभियंता भूषण महर्षी  विश्वेश्वरय्या यांना नमन करून  त्यांनी सर्व जनतेनी पाण्याचे महत्व ओळखून पाण्याचा काटकसरीने वापर करावा. पाणी ही राष्टीय संपत्ती असून आपण त्याचे मालक नसून विश्वस्त आहे या भावनेतून कार्य केल्यास भावी पिढीसाठी पाणी सोन्याहूनही मौल्यवान ठरणार आहे. आपण दगडांच्या तुकड्यांना रत्नांची संज्ञा देतो. प्राचीन ग्रंथामध्ये, सुभाषितकारांनी यथायोग्य वर्णन केले आहे. रत्नतुल्य किंबहुना त्यापेक्षा मौल्यवान असलेले पाणी हे सजीवांचे प्राण होय. प्राचीन काळात पाण्याची मुबलकता असतांनाही, सजीवांच्या जीवनात पाण्याचे महत्व किती असेल हे लक्षात घेऊन सुभाषितकारांनी रत्नांची उपमा बहाल करून वाड्ःमय साहित्यात पाण्याला स्थान देत पाण्याला रत्न म्हणटले.  आजच्या विज्ञान युगात पाण्याच्या संकटाने आकराल विकराल रूप धारण केले तरीही मनुष्य  पाण्याच्या काटकसरी कडे  दुर्लक्ष करीत आहे. या सर्व गोष्टी  लक्षात घेता येत्या काळात जल संकटाची  युद्धजन्य परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता नाकारतां येणार नाही, म्हणून पाण्यांचे महत्व नवरत्ना पेक्षा जास्त आहे.

गोसीखुर्दचे मुख्य अभियंता पवार म्हणाले पाण्यांचे महत्व अमूल्य आहे. आज आपल्याकडे उपलब्ध असलेल्या पाण्याचा थेंब ना थेंब उपयोगात आणून शेतक-यांच्या पिकांनसाठी उपलब्ध करून द्यायचा आहे. शेतक-यांनसाठी पाणी वापर संस्थाचे जाळे विणून शेतक-याला समृध्द करायचे आहे त्याकरीता सर्वाचे प्रयत्न आवश्यक आहे. 

भारतीय जलसंसाधन संस्थेचे सचिव प्रवीण महाजन पाणी समस्या कायमची संपवायची असेल तर प्रत्येक व्यक्तींला  तीन गोष्ट्री आचरणात आणाव्या लागतील. रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पर्जन्यजल संचय. वॉटर रिसायकलिंग म्हणजे पाण्याचा पुनर्वापर. वॉटर मॅनेजमेण्ट म्हणजे पाण्याचं नियोजन व गरजेनुसार वाटप या त्री सूत्रीला स्विकारावे लागेल, तरच पाणी समस्येवर मात करता येईल. 

विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता राजेश सोनटक्के यांनी महामंडळा तर्फे यावर्षीच्या जलजागृतीचे नियोजन व आयोजन विषयी माहिती देत महामंडळा अंतर्गत येणा-या सर्व कार्यालया मार्फत आप आपल्या धरण, तलाव परीसरात जलजागृती सप्ताह कोविड -१९ चे काटेकोर पालन करून साजरा होणार असल्याचे सांगितले. ज्या शेतक-यांच्या शेतापर्यन्त पाणी जात नाही त्या भागांत जावून पाणी पोहचविण्याचा प्रयत्न या जलजागृती सप्ताहाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. जलक्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी, शेतकरी यांचे अनुभव कथन व पाणी बचती बाबत च्या विविध विषयांचा समावेश असलेले ऑनलाईन वेबिनार, लोकल टीव्ही चॅनेल वर जल तज्ञाच्या मुलखती व जलसंपदा विभागाच्या निरीक्षण वाहनांवर पाणी बचती विषयक संदेशाचे चे बॅनर लावून  जलविषयक साक्षरता वृद्धिंगत करण्याविषयी सूचना क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्यात.

अधिक्षक अभियंता क. सु.  विमलकोंडा यांनी पाण्यांचे महत्व सांगताना शेतीसाठी पाणी देण्याच्या पद्धतीत मोठ्या बदलाची गरज निर्माण झाली आहे. पाटाच्या पाण्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याने यापुढे बंदीस्त वितरण व्यवस्थेद्वारे व सूक्ष्मसिंचनाद्वारे पाणी देण्यात येणार असल्याने गळती होणारे पाणी वाचेल. आपण आपल्या रोजच्या घरगुती पाणी वापरातून पाण्याची बचत करू शकतात अशा अनेक गोष्टीतून पाण्याची बचत करता येईल यासाठी जनतेने समोर येण्याची गरज आहे. 

कार्यकारी अभियंता रा. ना. ढुमणे, रोशन हटवार,  उरांडे, प्रवीण झोड, वंजारी तसेच महिला प्रतिनिधी अभियंता श्र्वेता प्रधान यांनी पण या अभासी जलजागृतील जलपूजन व जल प्रतिज्ञा घेत भाग घेतला. 

महामंडळ व इतर सर्व कार्यालयात जलपूजन व जल प्रतिज्ञा देवून एकाच वेळी सकाळी ११ वाजता सुरवात झाली. 

या कार्यक्रमाला मोजून प्रतिनिधीस्वरूप देण्यात आले होते.  शेवटी आभार विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता उरांडे यांनी केल्यावर हा अभासी पध्दतीने साजरा झालेला जलजागृती सप्ताहातील पहिला दिवस संपन्न झाला.