"वडेट्टीवार यांना अंधारात ठेवून अधिकाऱ्यांनी परस्पर घेतला "हा" निर्णय - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

११ मार्च २०२१

"वडेट्टीवार यांना अंधारात ठेवून अधिकाऱ्यांनी परस्पर घेतला "हा" निर्णय
एमपीएससी संदर्भात माझ्या विभागाने मला न विचारता सचिव स्तरावरून परस्पर घेतलेला निर्णय आहे. मला याबाबत काही ही माहिती नाही. मला अंधारात ठेऊन घेतलेला निर्णय असल्याने याबाबत चौकशी करण्यात येईल, असे ट्ववीट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.


MPSC कडून प्रसिद्ध झालेल्या पत्रकानुसर त्यांना १०मार्च म्हणजेच काल आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पत्र प्राप्त झाल्याचे नमूद केले आहे. कोरोना पॉजिटीव असल्यामुळे ७ दिवसांपासून मी हॉस्पिटल ला असून हा पूर्ण निर्णय सचिव स्तरावर झालेला आहे,या निर्णयाला माझे कोणतेही समर्थन नाही.


एमपीएससी परीक्षांच्या तारखांचे मृगजळ वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा , भविष्याचा चुराडा करतंय . प्रशासनाने परीक्षांवर दिलेली स्थगिती तात्काळ रद्द करून माणुसकी दाखवावी .