अल्ट्राटेक द्वारे ३५ युवकांना वाहन प्रशिक्षण #Vehicle #training #youth #through #Ultratech - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

१३ मार्च २०२१

अल्ट्राटेक द्वारे ३५ युवकांना वाहन प्रशिक्षण #Vehicle #training #youth #through #Ultratech
आवाळपूर :-
अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन, आवारपूर, हे नजीकच्या गावांची सर्व स्तरावरील प्रगती व्हावी यासाठी नेहमी प्रयत्नशील असते या वाढत्या लोकसंख्येमुळे बहुतांश युवक बेरोजगार असतात. त्यांना कुठेतरी आपल्या कौशल्यावरती रोजगार मिळावा याकरिता अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेअर फाऊंडेशन ने नजीकच्या गावातील ३५ युवकांना वाहन प्रशिक्षण देण्याचे ठरविले. विशेष म्हणजे त्या ३५ युवकांमध्ये एका मुलीचा समावेश आहे.

महाकाली ड्रायव्हिंग स्कूल, चंद्रपूर यांच्या सहाय्याने ३५ युवकांना वाहन प्रशिक्षण देऊन त्यांना परमनन्ट ड्रायव्हिंग फोर व्हीलर लायसन्स सुद्धा प्रदान करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा शुभारंभ अल्ट्राटेक सिमेंट वर्क्स चे युनिट हेड, विजय एकरे, यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला योगेश भट, श्रीनिवास चापा, आनंद पाठक, संजय पेठकर व वाहन प्रशिक्षक उत्तम काळे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला यशस्वीतेकरिता सचिन गोवारदीपे, देविदास मांदाळे व संजय ठाकरे यांनी अथक प्रयत्न केले