शेतकरी विरोधी कृषी कायद्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जुन्नरला धरणे आंदोलन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ मार्च २०२१

शेतकरी विरोधी कृषी कायद्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जुन्नरला धरणे आंदोलन

 शेतकरी विरोधी कृषी कायद्यांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे जुन्नरला धरणे आंदोलन
जुन्नर /आनंद कांबळे 

 वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड.प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार शुक्रवार दि.५ मार्च २०२१ रोजी धान्यबाजार, जुन्नर तहसिल कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडी जुन्नर तालुक्याच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.


यावेळी वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष जावेद मोमीन,महीला आघाडी च्या अध्यक्ष निलम खरात,महासचिव सागर जगताप,पुनम दुधवडे, उपाध्यक्ष फिरोज पटेल,संतोष डोळस,अंबादास पवार,गणेश वाव्हळ,घनश्याम जावळे,कविता शेलार,मंदाकिनी मेंगाळ,राजेंद्र भालेराव,शिवाजी तळपे,रोहिदास मंजुळ,मंदार कोळंबे,गौतम दुधवडे,महेश तपासे,प्रणव शिरसाठ,आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     यावेळी "शेतकरी विरोधी कायदे हे शेतकऱ्यांना घातक असुन सर्व शेतकरी कायदे हे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र असुन,जोपर्यंत दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी मागे हटणार नाही" तसेच,"शेतकरी,कामगार व सामान्य जनतेला मेटाकुटीस आणनाऱ्या सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला."

     कार्यक्रमाचे प्रास्तविक अध्यक्ष जावेद मोमीन यांनी केले,सुत्रसंचालन गणेश वाव्हळ यांनी केले तर आभार संतोष डोळस यांनी व्यक्त केले.याप्रसंगी निलम खरात,पुनम दुधवडे,महेश तपासे,सागर जगताप,घनश्याम जावळे,शिवाजी तळपे,मंदाकीनी मेंगाळ,आदींनी तीव्र शब्दांत आपल्या भावना व सरकारविरोधी रोष व्यक्त केला.यावेळी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जुन्नर चे नायब तहसिलदार सचिन मुढे यांना निवेदन देण्यात आले,तसेच नायब तहसिलदारांनी सदरचे निवेदनाचा अहवाल तात्काळ वरीष्ठांना पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले.आंदोलन यशस्वी होण्यासाठी वंचित आघाडीचे नेते व मार्गदर्शक दर्शनभाऊ फुलपगार ,राकेशभाऊ डोळस,यांचे मोलाचे सहकार्य लाभले.