वडगाव प्रभागातील खनिज विकास निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे आ. जोरगेवार यांच्या हस्ते भूमीपूजन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

०७ मार्च २०२१

वडगाव प्रभागातील खनिज विकास निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे आ. जोरगेवार यांच्या हस्ते भूमीपूजन 

        चंद्रपूर शहरातील वडगाव प्रभाग क्रमांक ८ मधील खनिज विकास निधी अंतर्गत ५० लक्ष रुपयांचे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळेनगरसेविका सुनीता लोढिया, नगरसेवक पप्पू देशमुख, नगरसेवक देवानंद वाढईपंकज पवारओबीसी जिल्हा अध्यक्ष,किशोर काकडेप्रमोद माणुसमारेगोयलदीपक ठोंबरे, नेव्हरे मॅडम, पंकज गुप्तासंचालन डॉ. विजय निरंजनेआकाश पुट्टेवारअनिकेत राठोडसोहम जाधवआदींची उपस्थिती होती.

          चंद्रपूर शहरातील वडगाव प्रभाग क्रमांक ८ मधील रस्ता हा अतिशय खराब झाला होता. त्यामुळे या रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी केली होती. याची दखल घेत आमदार किशोर जोरगेवार यांच्या विशेष प्रयत्नातून खनिज विकास निधीतून हा मार्ग मंजूर करण्यात आला आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत आज या कामाचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. आत लवकरच हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार असल्याने नागरिकांची मोठी अडचण दूर होणार आहे. येथील नागरिकांची जुनी मागणी मार्गी लावता आली याचे समाधान असल्याचे यावेळी आमदार जोरगेवार यांनी म्हटले आहे.