पट्टेदार वाघाचा मालगाडीच्या धडकेत मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०८ मार्च २०२१

पट्टेदार वाघाचा मालगाडीच्या धडकेत मृत्यू

गोंदिया जिल्ह्यातील गोंगली हिरडामली रेल्वेस्थानकाच्या दरम्यान साधारणत: दीड वर्षे वयाच्या वाघाच्या बछड्याचा मालगाडीखाली येऊन मृत्यू झाला आहे. याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. टी-14 वाघीणीच्या तीन बछड्यांपैकी हा एक आहे. वाघीण आणि तिचे दोन बछडे सुरक्षित आहे.


नागझिरातील पूर्व भागामधून गोंदिया चंद्रपूर ही रेल्वे लाईन जाते. अभयारण्याच्या लगत असल्याने अनेक वन्यजीव या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वावरत असतात. दरम्यान वाघिणीचे तीन बछडे आणि वाघिन रेल्वे रुळ ओलांडत होते. यावेळी एका बछड्याला रेल्वेची धडक बसली. या घटनेत त्याचा मृत्यू झाला आहे. सकाळी सहा वाजेची ही घटना आहे. बल्लारशाकडून गोंदियाच्या दिशेने येणाऱ्या माल गाडीने बछड्याला धडक दिली आहे.

आज दि. 08/03/2021 रोजी 08:00 वाजेच्या सुमारास रेल्वे गोंदियाच्या हद्दीत, रेल्वे स्टेशन गोंगली-हिरडामाली रेल्वे मार्ग दरम्यान. एम 1025 / 07-08 रोजी माल ट्रेन (एन-बॉक्स) वरुन वाघ रन ओव्हर झाल्याची नोंद झाली आहे.

या घटने बाबत वन विभागाला वर्किंग स्टेशन मास्टर हिरडमाळी यांनी कळविले आहे. प्राप्त माहितीनुसार, वन विभागाकडून घटनेच्या संदर्भात सध्या कारवाई सुरू आहे