वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू - - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

१० मार्च २०२१

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू -


सावली तालुक्यातील पाथरी उपवनपरिक्षेत्रातील घटना


पाथरी/ प्रतिनिधी
वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सावली तालुक्यातील पाथरी उपवनपरिक्षेत्रात घडली आहे.दादाजी मस्के असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते डोंगरगाव येथील रहिवासी आहेत.सावली वन परिक्षेत्र अंतर्गत पाथरी उपवनक्षेत्रातील कक्ष क्रमांक 1679 मध्ये शेतकरी दादाजी मस्के हे सरपण आणण्यासाठी गेले होते.मात्र दबा धरून असलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती ग्रामस्थानी वनविभागाला दिली. त्यावरून वनअधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी जावुन पंचनामा केला.या क्षेत्रात वाघाचा मोठा वावर असून शेतकरी या हल्या मुळे भयभीत झालेले आहे.त्यामुळे या परिसरातील वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.