क्रीडा विषयक कामगिरी व उंचावण्याकरिता क्रीडा विभाग, लष्कर आणि एन.सी.सी.यांनी समन्वयाने काम करावे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ मार्च २०२१

क्रीडा विषयक कामगिरी व उंचावण्याकरिता क्रीडा विभाग, लष्कर आणि एन.सी.सी.यांनी समन्वयाने काम करावे

 क्रीडा विषयक कामगिरी व उंचावण्याकरिता क्रीडा विभागलष्कर आणि एन.सी.सी.यांनी समन्वयाने काम करावे


 क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार

 

          मुंबई,दि. 30 : राज्याची क्रीडा विषयक कामगिरी अधिक उंचावण्याकरिता राज्य क्रीडा विभागलष्कर आणि एन.सी.सी.यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

          लष्कर आणि एन.सी.सी.यांच्यासमवेत मंत्रालयातून दृकश्राव्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी क्रीडा विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरीया, सेवानिवृत ब्रिगेडीअर सुधीर सावंतएन.सी.सी. महाराष्ट्रचे अतिरिक्त महासंचालक वाय.पी.खांडुरे यांची उपस्थिती होती.

          क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले,ऑलंम्पिक क्रीडा स्पर्धांसह राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक देश क्रीडा क्षेत्राकडे व्यापक दृष्टीकोन ठेवून शालेय शिक्षणाबरोबर खेळाला महत्व देत आहेत. महाराष्ट्रात क्रीडा विषयक विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त सुवर्णपदके मिळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक आणि त्या दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

          सेवानिवृत ब्रिगेडीअर सुधीर सावंत यांनी दिलेल्या निवेदनाविषयी बोलतांना श्री. केदार म्हणाले राज्याला क्रीडा प्रशिक्षकांची आवश्यकता आहे. लष्करातील तिन्ही दलांकडे विभागात उत्कृष्ट प्रशिक्षक आणि पायाभुत सुविधा उपलब्ध आहेत. तसेच एन.सी.सी.विभागाकडेही विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. लष्कर आणि एन.सी.सी.विभागाकडे असणा-या यासुविधा राज्यातील विविध भागामध्ये उपलब्ध आहेत.या सुविधांचा राज्यातील तरुण खेळाडूंकरीता उपयोग करण्यासाठी क्रीडा विभागलष्कर आणि एन.सी.सी.यांचा समन्वय महत्वाचा आहे. आज झालेल्या बैठकीत सर्वांनी सकारात्मकता दर्शवली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

          सिंधुदुर्ग येथील क्रीडा संकुल एन.सी.सी.कडे प्रायोगिक तत्वावर  देण्याविषची माहिती घेवून निर्णय घेण्यात येणार असून या ठिकाणी खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी यावेळी सांगितले.