लॉकडाऊनच्या भीतीने शेअर बाजार स्थिर! - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३० मार्च २०२१

लॉकडाऊनच्या भीतीने शेअर बाजार स्थिर!

मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होण्याचे संकेत मिळत असल्याने मुंबई शेअर बाजारात आज स्थिरता दिसत आहे. आज(मंगळवारी) सकाळी भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. अमेरिकेतील शेअर बाजारमध्ये मागील दोन-तीन दिवसात विविध कंपन्याच्या शेअर्सच्या किंमतीत वाढ झाली होती. त्याची प्रचिती भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मंगळवारी पाहायला मिळाली. बीएसईचा (BSE) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 700 अंकांच्या वाढीसह सध्या 49880 च्या पातळीवर व्यापार करत आहे. तर,निफ्टी निर्देशांक 40 अंकांच्या वाढीसह 14,700 च्या पातळीवर आहे. आजच्या बाजारात बँक, धातू, दैनंदिन जीवनातील वस्तू(एफएमसीजी) आणि वित्तीय शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली. ऑइल, गॅस, ऑटो क्षेत्रात घट पाहायला मिळत आहे.