रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीसाठी उद्योजकांनी सामाजिक दायित्व स्विकारावे - जिल्हाधिकारी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ मार्च २०२१

रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीसाठी उद्योजकांनी सामाजिक दायित्व स्विकारावे - जिल्हाधिकारीसि.एस.आर. बैठकीत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे उद्योजकांना आवाहन

चंद्रपूर दि. 23 मार्च : शहरातील ऐतिहासिक रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करुन सौंदर्यीकरण करण्यासाठी  उद्योजकांनी सामाजिक बांधिलकी अंतर्गत (सि.एस.आर.) सकारात्मक प्रतिसादर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी काल सि.एस.आर. प्रमुखांच्या आढावा सभेत जिल्हाधिकारी कार्यालयात वीस कलमी सभागृहात केले.

रामाळा तलावातील गाळ काढणे, एस.टी.पी. बसविणे, रिटेनिंग वॉलचे काम व पुल बांधण्याचे कामे मंजुरीबाबत शासनास प्रस्ताव पाठविलेला आहे. सामाजिक बांधिलकी अंतर्गत उद्योजक कंपनी यांनी निधीची व्यवस्था करावी किंवा मशीनरी उपलब्ध करुन द्यावी, याबाबत येत्या सात दिवसात सर्व उद्योजक प्रमुखांनी आप-आपले सहकार्य उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांच्या कार्यालयास कळवावे. उद्योजकाचे योगदान कशाप्रकारे प्राप्त होईल याबाबत पुनश्च: आढावा बैठक घेण्यात येईल असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी सांगितले.

आढावा सभेस अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पल्लवी घाटगे, कार्यकारी अभियंता पाटबंधारे श्याम काळे, उपकार्यकारी अभियंता पाटबंधारे (यांत्रिकी) श्री. बिसने, इकोप्रोचे  पर्यावरण  विभाग प्रमुख नितीन रामटेके, व जिल्ह्यातील उद्योजग प्रमुख उपस्थित होते.