संत नरहरी महाराजांनी संपूर्ण समाज जोडण्याचे काम केले - माजी मंत्री राजकुमार बडोले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०६ मार्च २०२१

संत नरहरी महाराजांनी संपूर्ण समाज जोडण्याचे काम केले - माजी मंत्री राजकुमार बडोले

संत नरहरी महाराजांनी संपूर्ण समाज जोडण्याचे काम केले - माजी मंत्री राजकुमार बडोले

 नवेगावबांध येथे सोनार समाज भवनाचे लोकार्पण

 


मान्यवरांचा सत्कार, रांगोळी व वेशभूषा स्पर्धांचे आयोजन.

संजीव बडोले प्रतिनिधी.

नवेगावबांध दि.6 मार्च:-

  संत नरहरी महाराज चौदाव्या शतकातील थोर संत होऊन गेलेत त्यांनी संपूर्ण समाज जोडण्याचे काम केले त्यांच्या शिकवणी वरच आज संपूर्ण समाज वाटचाल करीत आहे असे प्रतीपादन माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले, ते  संत श्री नरहरी महाराज सोनार समाज भवन लोकार्पण सोहळा व पुण्यतिथी कार्यक्रमात नवेगावबांध येथे बोलत होते. माजी मंत्री बडोले यांनी सुचवलेल्या कामाअंतर्गत २५१५ शिर्षा अंतर्गत सदर सोनार समाज भवन ५लक्ष निधीतुन करण्यात आले. 

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ प्रदीप रोकडे अध्यक्ष जिल्हा सोनार समाज संघटना गोंदिया ,कार्याध्यक्ष मधुकर कावळे ,प्राध्यापक भजे, नरेंद्र भुजाडे, अशोक काळबांधे ,हेमंत पोगडे, अमृतलाल यावलकर, रचनाताई गहाणे, नवेगाव ग्राम पंचायत सरपंच अनिरुद्ध शहारे ,उपसरपंच रघुनाथ लांजेवार, सामाजिक कार्यकर्ता खुशाल काशिवार मुलचंद गुप्ता ,अण्णा डोंगरवार ,सामाजिक कार्यकर्ता संतोष नरुले, जगदीश पवार ,सतीश कोसरकर ,बाबुराव नेवारे , रेवचंद  शहरे,मधुकर कावळे इंजि होमराज पुस्तोडे, इंजि संजय खरवडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

   सोनार समाजाच्या पारंपरिक व्यवसायावर स्पर्धा सुरू झाल्यामुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येवून समाज संघटना मजबुत करुन पुढील वाटचाल करावी असे आवाहन बडोले यांनी पुढे बोलतानी केले. 

संत हे कोणत्याही एका जातिसमूहाचे नसतात ते सर्व मानव समाजासाठी प्रेरणास्थान असतात ,सद्याची पिढी ही वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारी आहे असे मत नरुले यांनी व्यक्त करत बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले अशा शब्दांत माजी मंत्री बडोले यांची स्तुती केली .समाजाने संघटीत होवून सहकार्याने समाज हितासाठी कार्य करावे तरच आपला समाज सद्यस्थितीवर मात करु शकेल असे मत अध्यक्षीय भाषणात डॉ प्रदीप रोकडे यांनी मांडले .ईतरही मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. सुरुवातीला फित कापून व संत नरहरी महाराज यांच्या प्रतीमेचे पुजन व द्विप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. किर्तनकार हाडगे महाराज पिंपरी वाले यांच्या सुमधुर वाणीतून गोपाल काला करण्यात आला याकरिता स्थानिय श्री संतोषी माता भजन मंडळ व जय दुर्गा भजन मंडळ यांनी सहकार्य केले . रांगोळी स्पर्धा व बालकांची विविध वेषभूषा स्पर्धा घेण्यात आली.समाजातील विविध क्षेञातील नावलौकिक व्यक्तींसह माजी मंत्री बडोले यांचाही सत्कार करण्यात आला .सहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

स्थानिय मंडळाचे अध्यक्ष कृष्णराव गजापुरे यांनी प्रास्ताविक मांडले, संचालन तमुस अध्यक्ष महादेव बोरकर यांनी तर आभार हाडगे महाराज यांनी मानले. 

कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी जनार्दन पोवळे, हरिभाऊ पोवळे, त्र्यंबक बेहरे ,दिलीप पोवळे, पुरुषोत्तम रोकडे, प्रदीप गजापुरे, लायकराम फाये, स्वाती गजापुरे,सरोज पोवळे,स्नेहल गजापुरे,अर्चना टेटे, सुनंदा फाये, संध्या गजापुरे, दिपाताई खरवडे आदींनी विशेष प्रयत्न केले.