मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी समाधान औताडे यांना उमेदवारी - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

३१ मार्च २०२१

मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी समाधान औताडे यांना उमेदवारी

 मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीसाठी समाधान औताडे यांना उमेदवारी

 

पंढरपूर येथील मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून समाधान औताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाच्या केंद्रीय सांसदीय मंडळाने ही उमेदवारी जाहीर केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

श्री.समाधान औताडे हे गेल्या पाच वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रात पदवीचे शिक्षण घेतले असून बांधकाम व्यवसायिक आहेत. तसेच ते साखर निर्मिती उद्योगात कार्यरत आहेत. सोलापूर येथील विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालकपद ते भूषवित असून सोलापूर जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्षही आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून श्री. औताडे यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. मंगळवेढा तालुक्यात त्यांनी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आरोग्यवैद्यकीय तसेच रोजगार शिबिरांचे आयोजन केले आहे. लॉकडाऊन काळात श्री. औताडे यांनी विविध माध्यमातून गरजू समाजघटकांना सहाय्य केले आहे. तसेच पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठीही श्री. औताडे विविध उपक्रमांचे आयोजन सातत्याने करीत असतात.