मंगळवारी (23 मार्च) सकाळी बस आणि ऑटो रिक्षाची जोरदार धडक; 13 जणांचा मृत्यू - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

२३ मार्च २०२१

मंगळवारी (23 मार्च) सकाळी बस आणि ऑटो रिक्षाची जोरदार धडक; 13 जणांचा मृत्यूमध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एका बस आणि ऑटो रिक्षाची जोरदार धडक झाली. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अपघाताच चार जण गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत. मृतांमध्ये महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (23 मार्च) सकाळी ग्वाल्हेरमधील जुनी छावणी परिसरामध्ये हा भीषण अपघात झाला. यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना चार लाख रुपये तर जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी या महिला स्वयंपाक बनवण्यासाठी जात होत्या. त्याचवेळी समोरुन आलेल्या बसने रिक्षाला समोरून धडक दिल्याने अपघात झाला.