रामाळा तलाव करिता विशेष निधीची मागणी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

२००९ पासून वाचकांच्या सेवेत०१ मार्च २०२१

रामाळा तलाव करिता विशेष निधीची मागणी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

 रामाळा तलाव करिता विशेष निधीची  मागणी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन चंद्रपूर शहरातील गोंडकालीन एेतिहासिक वारसा असलेले रामाळा तलाव प्रदूषण मुक्त व खोलीकरणासह अन्य मागणी करिता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

दिनांक 26 फेब्रुवारी 2021 रोजी महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी ऐतिहासिक वारसा असलेल्या आपल्या रामाळा तलावावर माझे विशेष प्रेम आहे. माझ्या कार्यकाळात मी या ठिकाणी सौंदर्यीकरण करून सुंदर रस्ता, स्ट्रीट लाईट, तलावाला स्टीलचे ग्रील व सिंगापूर पॅटर्नचा स्टॅच्यू उभारून सौंदर्यीकरण करण्यात आले.
तलावाची साफसफाई मनपा मार्फत करण्यात येत आहे. तलावात इकॉर्निया असल्याने इकॉर्निया पण मनपाच्या मार्फत काढुन स्वच्छता करण्यात येते.  तसेच तलावात प्रदूषण होऊ नये याकरिता गणपती विसर्जनास बाप्पाच्या विसर्जनासाठी कृत्रिम कुंड लाऊन त्या कुंड मध्ये विसर्जन करतात व भाविकांच्या श्रद्धेच्या विचार करून बाप्पाच्या निर्माल्य निर्माल्य कलशमध्ये जमा करण्यात  येते. व आतापर्यंत 7799 मूर्तीचे विसर्जन हे कृत्रिम तलावात करण्यात आले आहे. जनतेनेही याला खूप जास्त प्रमाणात प्रतिसाद देऊन सहकार्य केले आहे.
रामाळा तलाव प्रदुषणमुक्त करण्याकरीता चंद्रपूर शहर महानगरपालिका सदैव प्रयत्नशील आहे. रामाळा तलाव संदर्भात असलेल्या वेगवेगळ्या समस्यांसाठी महानगरपालीकेतर्फे वेळोवेळी प्रशासनासोबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे.   सद्यस्थितीत रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीसाठी विविध कामे करण्याची आवश्यकता आहे. या कामांचे अंदाजपत्रकही मनपातर्फे सादर करण्यात आले आहे.  
              रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीसाठी तलावातील गाळ काढुन स्वच्छ करणे, तलावाच्या पश्चिम बाजुला रिटेनिंग वॉल बांधकाम करणे , मलःनिस्सारण प्रक्रिया STP चे  बांधकाम करणे  तसेच मच्छीनाल्याचा प्रवाह झरपट नदी येथे वळविण्याकरीता पक्के नाला बांधकाम, तलावाचे खोलीकरण व सौंदर्यीकरण इत्यादी कामांचा समावेश असुन या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असुन गाळ काढण्यासाठी व खोलीकरणसाठी निधी आवश्यकता भासणार आहे. चंद्रपूर  शहर महानगरपालिकेचे आर्थिक स्रोत असलेली करवसुली अत्यंत कमी झाली असल्याने मनपाकडे निधीची कमतरता आहे. अश्या परिस्थितीत रामाळा तलाव विकासकामे करण्यास  रुपये ५० कोटी इतका निधी उपलब्ध करून देण्यास जिल्हाधिकारी कार्यालयात महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी आपल्या सहकाऱ्या सोबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी मनपाचे उपमहापौर श्री. राहुल पावडे, स्थायी समितीचे सभापती श्री. रवी आसवानी, भाजपा शहर अध्यक्ष डॉ. मंगेशजी गुलवाडे, मनपाचे सभागृहनेते श्री. संदीप आवारी, नगरसेवक श्री.विशाल निंबाळकर, श्री सुभाष कासनगोट्टुवार,  श्री ब्रिजभूषण पाझारे व  श्री. प्रकाशजी धारणे, श्री. दत्तप्रसन्नजी महादानी उपस्थित होते.