रश्मी ठाकरे यांना रुग्णालयात हलविले - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

३० मार्च २०२१

रश्मी ठाकरे यांना रुग्णालयात हलविले


30/03/2021

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची 23 मार्च रोजी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर आज त्यांनी दक्षिण मुंबईतील HN रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. रश्मी ठाकरे यांना रुटीन तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. पण आता त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यापूर्वी त्यांचे पुत्र आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाचा फटका सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयाला देखील बसला आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार, शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे, चंद्रकांत खैरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरातच कोरोनाने शिरकाव केला आहे. आधी आदित्य ठाकरे आणि आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांना कोरोना झाल्याची माहिती समोर येत आहे.

........

Update- 23/03/2021

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाचा फटका सरकारमधील मंत्री आणि मंत्रालयाला देखील बसला आहे. आता महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे ते दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह निघाले आहेत.

मागील काही महिन्याआधी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचे दोन स्वीय सहाय्यक, मुंबईतील वाहन चालक, स्वयंपाकी, बीडचा वाहन चालक यांचा समावेश होता. आता आज मंगळवारी रात्री माझी आज दुसऱ्यांदा कोरोना चाचणी positive आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा,सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी, असं ट्विट मुंडे यांनी केले आहे.