महाराष्ट्राला लाजेने मान खाली घालायला लावलं त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे : मनसेप्रमुख राज ठाकरे - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या

२१ मार्च २०२१

महाराष्ट्राला लाजेने मान खाली घालायला लावलं त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे : मनसेप्रमुख राज ठाकरे

किती आयुक्तांकडे किती मागितले ह्याचा तपशील पण कळला पाहिजेमहाराष्ट्राला लाजेने मान खाली घालायला लावलं त्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे

जर गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना १०० कोटी रुपये मागत असतील तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले ह्याचा तपशील पण कळला पाहिजे, अशी मागणी मनसे चे प्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. 

यावेळी ते म्हणाले, वाजे शिवसेना पक्षा मध्ये प्रवेश केला. शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करायला वाजेला कोण घेऊन गेलो होता, अजून हा प्रश्नच उत्तर मिळाले नाही. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले की वाजेना पोलीस खात्यात घावे, याचा अर्थ एवढाच या वाझे शिवसेनेचे अध्यक्ष आणि आताचे मुख्यमंत्री यांच्या अत्यंत जवळचा माणूस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी यांच्या अत्यंत मधुर संबंध आहेत. मुळात मुकेश अंबानींच्या घराच्या बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे तो विषय मागे पडला आहे? त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आलं? ह्याची उत्तरं अजून का नाही मिळाली?

मुळात परमबीर सिंग ह्यांना त्यांच्या पदावरून का हटवलं, जर ते दोषी होते तर मग त्यांना निलंबित का नाही केलं? त्यांची चौकशी का नाही केली गेली? त्यांची बदली का केली गेली?

गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला १०० कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे