विज पुरवठा खंडीत; महिलांचा पाण्यासाठी टाहो - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

Marathi news | मराठी बातम्या । ताज्या बातम्या


२६ मार्च २०२१

विज पुरवठा खंडीत; महिलांचा पाण्यासाठी टाहो
नांदा ग्रामपंचायतीने विज देयक थकविले


गौतम धोटे /कोरपना आवारपूर
येथूनच जवळच असलेल्या नांदा येथील सिमेंट सर्वांत मोठी श्रीमंत औद्योगिक नगरी ग्रामपंचायत नांदाने कोरपना तालुक्यातील आणी या  महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीचे वीज बिल थकविल्याने वीजपुरवठा खंडित केल्याने मागील चार दिवसांपासून पाण्याकरिता महिलांची भटकंती सुरु आहे नांदा ग्रामपंचायतीत सुजाण व राजकारणाचा अनुभव असलेल्या सत्ताधारी सदस्यांचे आर्थिक नियोजनच व्यवस्थित नसल्याने दर वर्षी ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन कापले जाते असा आरोप ग्रामपंचायत सदस्य अभय  मुणोत यांनी लावला आहे

नांदा ग्रामपंचायतीव्दारे नांदा गावात पाणी पुरवठा केला जातो या योजनेचे ६२,२७०/- रुपये ग्रामपंचायतीने थकविल्याने महाराष्ट्र विद्युत वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा खंडित केला असल्याने मागील पाच दिवसांपासून महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे या संबंधात ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता नागरिक नियमित कर भरत नसल्याने सद्या  पाणीकराचे खात्यात शिल्लक रक्कम कमी असल्याने विज देयक थकले असल्याने वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे 

*जलस्वराज्यचा भोंगळ कारभार*

जलस्वराज्यव्दारे नांदाफाटा येथे १० कोटी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु आहे  दोन महीन्यापासून पाणी पुरवठा सुरु झाला असून टेस्टींग सुरु आहेत या योजनेचे जवळपास १लाख ८७ हजार रुपयाचे वीज बिल कंत्राटदाराने थकविल्याने नांदाफाटा येथील पाणीपुरवठा मागील पाच दिवसापासून बंद असल्याने महिलांना कमालीचा त्रास होत आहे जलस्वराज्यचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला असून जलस्वराज्यच्या अधिकार्‍याकडूनच  कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा प्रकार सुरु आहे राजुरा विधानसभा क्षेत्राचे  आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी जलस्वराज्यच्या भोंगळ कारभाराची चौकशी शासन स्तरावर लावावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे 

कराचा भरणा करण्याची गरज
नांदा येथील अनेकजण नियमित कराचा भरणा करीत नाही जवळपास ६० लाख रुपये वसुली थकीत आहे वसुली नसल्याने विज बिल भरण्यात आले नाही नागरिकांनी नियमित कराचा भरणा केल्यास साफसफाई व इतर विकासकामे करता येतील नागरिकांनी करचा भरणा केला पाहीजे

         

नियोजन नसल्याने विज पुरवठा खंडीत
नांदा ग्रामपंचायतीला जवळपास ११ लाख रुपये कर अल्ट्राटेक कंपनीने जमा केला आहे मोबाईल टाॅवर कंपन्यांकडूनही मोठ्याप्रमाणात कर भरला जातो मागच्या वर्षीही विज पुरवठा खंडीत करण्यात आला होता सत्ताधार्‍यांचे नियोजन व्यवस्थित  नसल्याने परत  विज पुरवठा खंडीत होण्याची नामुश्की ओढावली आहे 

          महेश राऊत
               नांदा