भाजयुमोने विद्यापीठाच्या परिक्षांसंदर्भात दिले पोलीस आयुक्तांना निवेदन - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

३१ मार्च २०२१

भाजयुमोने विद्यापीठाच्या परिक्षांसंदर्भात दिले पोलीस आयुक्तांना निवेदन
कुलगुरू सोबत चर्चा करण्याची केली मागणी अन्यथा युवा मोर्चा करणार उग्र आंदोलन

आज रातुम नागपूर विद्यापीठाची इंजिनिअरींग ची हिवाळी २०२० ची परीक्षा तसेच बीए आणि बीकॉम च्या हिवाळी २०२० च्या परीक्षा होत्या. ११ वाजता पासून विद्यार्थी लॉग इन करण्याच्या प्रयत्न करत होते. हजारो विद्यार्थ्यांना ह्या संबंधित अडचणींना सामोरे जावे लागले. काही विद्यार्थी लॉग इन करू शकले तर बरेच वंचित राहिले. ५ वाजेपर्यंत आपण प्रयत्न करत राहावे अशी सूचना विद्यापीठाकडून करण्यात आली. मागील वर्षी सुद्धा हीच परिस्थिती परीक्षेदरम्यान होती. आपण एजन्सी ला सांगून चूक सुधारेल असेआश्वासन सुद्धा दिले होते. पण दुर्दैवाने आज सुद्धा हेच चित्र बघावे लागले.

परीक्षेचे टेन्शन असताना विद्यार्थ्यंना केवळ एका एजन्सी च्या चुकी मुळे मनस्ताप सहन करावा लागणे म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणे आहे.

वारंवार कुलगुरूंना निवेदन दिले असल्यास, ते केवळ उडवाउडवी चे उत्तरे देतात आणि ज्या कुठल्या एजेन्सी ला काम दिले आहे त्यांची बाजू घेतात. आणि विद्यार्थीच कसे चूक आहे ह्याचे विवरण देतात.

आज भारतीय जनता युवा मोर्चा आपणास विनंती करतो कि, ह्या विषयात हस्तक्षेप करावा त्या एजन्सी ला तात्काळ निलंबित करून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणे थांबवावे अन्यथा युवा मोर्चा भविष्यात उग्र आंदोलन उभे करेल आणि होणाऱ्या परिणामास युवा मोर्चा जवाबदार राहणार नाही.

विद्यार्थांच्या आयुष्यासोबत खेळणे विद्यापीठाने बंद करावे, ज्या विद्यार्थांच्या परिक्षा तांत्रिक अडचणीनमुळे झाल्या नाहीत त्याच्या परिक्षा पुन्हा घेण्यात याव्या अन्यथा येणार्या दिवसात भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर महानगर उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल.
या संदर्भात शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी वखरे यांच्या मार्गदर्शनात, भाजयुमो प्रदेश सचिव कल्याण देशपांडे यांच्या उपस्थितीत तसेच भाजयुमो शहर अध्यक्ष पारेंद्र (विक्की) पटले नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने सर्व मंडळ अध्यक्ष शेखर कुर्यवंशी, यश सातपुते, बादल राऊत, सन्नी राऊत, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रितेश राहाटे, प्रसाद मुजुमदार उपस्थित होते.