पारुंडे च्या ब्रह्मनाथ विद्यालयातील माजी विद्यार्थी रंगला स्नेहमेळावा - KhabarBat™

Breaking

KhabarBat™

kavyashilp™ Digital Media •Reg• MH20D0050703

०५ मार्च २०२१

पारुंडे च्या ब्रह्मनाथ विद्यालयातील माजी विद्यार्थी रंगला स्नेहमेळावा
जुन्नर /वार्ताहर
पारुंडे ( ता जुन्नर ) येथील श्री ब्रह्मनाथ विद्यालयातील 23 वर्षांपूर्वी च्या मार्च १९९७ एस एस सी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आमंत्रण च्या परिसरात संपन्न झाला.
यावेळी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक फकिर आतार यांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले, या प्रसंगी शिवकार्य अर्बन को ऑप.क्रेडिट सोसायटी चे चेअरमन जितेंद्र बिडवई , इंग्रजी विषयाच्या सिनिअर शिक्षिका तारा डुंबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस्वती पूजन व दीपप्रजवलन करण्यात आले .
या दरम्यान शाळेतील आठवणींना उजाळा देत आपला परिचय करून दिला .अनेक विद्यार्थी मनोगत व्यक्त करताना भावनाविवश झाले .या प्रसंगी सलग २ वेळा विठ्ठलवाडी सरपंचपदी निवड झाल्याबद्दल आदिनाथ चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला .
हा मेळावा यशस्वी होण्यासाठी आदिनाथ चव्हाण , सुनील मोदे , सचिन लोखंडे , शुभांगी पवार , रमेश पवार , शकुंतला दातखिले , रामकृष्ण डेरे ,महेंद्र पवार, यांनी खूप मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिनाथ चव्हाण , सुत्रसंचालन सुनील मोदे यांनी केले , सामूहिक पसायदाना नंतर कार्यक्रम समाप्त झाला